शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

युती सरकारला शिवसैनिकांकडून घरचा अहेर

By admin | Updated: March 8, 2015 00:35 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, ...

चंद्रपूर: राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे आत्महत्येच्या मार्गाला लागला असताना राज्यातील युती सरकार आणि केंद्रातील भाजपा नेतृत्वातील सरकार केवळ शेतकऱ्यांची उपेक्षाच करीत आहे, असा आरोप करीत चंद्रपुरात शिवसैनिकांनी चक्क आंदोलनादरम्यान निषेधात्मक मुंडन करून आपल्याच सरकारला घरचा अहेर दिला.आपल्या पूर्वनियोजित आंदोलनानुसार शिवसेना आमदार तथा जिल्हाध्यक्ष बाळू धानोरकर यांच्या नेतृत्वात शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे धरणे देण्यात आले. या दरम्यान सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला एक निवेदनही पाठविण्यात आले.शिवसेनेने आंदोलनादरम्यान केलेल्या मागण्यांमध्ये भूसंपादन विधेयक रद्द करण्याची प्रमुख मागणी आहे. यासोबतच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत ९ हजार रुपये मदत, अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत द्या, औद्योगिक जिल्ह्यामुळे प्रदूषण असल्याने कर्मचाऱ्यांना प्रदूषण भत्ता तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रदूषणामुळे नुकसान होत असल्याने शेतपिकांना मोबदला, स्वस्त धान्य दुकानदारांच्या समस्यांचे निराकरण आदी मागण्यांचा समावेश आहे. सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणा देण्यात आला. यात आमदार बाळू धानोरकर, सतीश भिवगडे, अनिल धानोरकर, दिलीप कपूर, किशोर जोरगेवार, राजू महाजन, बाळू चिंचोलकर, नितीन मत्ते, अनिल वनकर, प्रतिभा धानोरकर, कुसुम उदार, विलास डांगे, गजानन बुटके, प्रफुल्ल चटकी, भास्कर ताजणे, सचिन भोयर आदींचा प्रामुख्याने समावेश होता. (नगर प्रतिनिधी)