शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
3
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
4
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
5
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
6
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
7
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
8
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
9
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
10
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
11
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
12
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
13
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
14
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
15
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
16
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
17
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
18
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
19
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
20
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊननंतर शहराने अनुभवली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 05:01 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. या कालावधीत भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली.

ठळक मुद्देखरेदीसाठी झुंबळ : दीड महिन्यानंतर नागरिक रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लागू झालेले लॉकडाऊन काही अटी शिथिल करून उठविल्यानंतर चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच शहरांनी सोमवारी प्रचंड गर्दी अनुभवली. आतापर्यंत केवळ जीवनाश्यक वस्तुंपुरतेच गरजा भागविणाऱ्या नागरिकांनी विविध वस्तुंची खरेदीसाठी बाजारात आल्याने झुंबळ उडाली होती. शहरातील सर्वच रस्त्यांवर दुपारी २ वाजेपर्यंत वाहनांची वर्दळ दिसून आली.कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने २३ मार्च रोजी लॉकडाऊन लागू केले. त्यानंतर केंद्र शासनाच्या आदेशानुसार लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली. या कालावधीत भाजीपाला, किराणा, औषधी आदी जीवनावश्यक वस्तुंची दुकाने वगळून सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. दरम्यान, जिल्ह्यात कोरोनाचा एक आढळल्याने प्रशासनाने लॉकडाऊन आणखी कडक केले. रूग्ण आढळलेल्या परिसराला सील करून संचारावर निर्बंध घातले. तेव्हापासून १० मे पर्यंत एकही रूग्ण न आढळल्याने लॉकडाऊमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. त्यानुसार वेळापत्रक जारी करून जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ आणि अन्य सर्व दुकाने सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याची परवानी दिली. त्यामुळे सोमवारी शहरातील सर्व रस्ते गर्दीने फु लून गेले होते. खरेदीसाठी बाजारात झुंबड उडाल्याचे दिसून आले.व्यावसायिकांनी केली दुकानांची स्वच्छताजिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन शिथिलतेची घोषणा केल्यानंतर मनपाच्या सूचनेनुसार चंद्रपूर शहरातील बहुतेक व्यावसायिकांनी रविवारी दुकाने सॅनिटाईझ केली. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, याकरिता ग्राहकांना उभे राहण्यासाठी बांबू व दोरी लावून अंतर ठेवण्याची व्यवस्था केली.बांधकाम साहित्याच्या किंमती वधारल्याउन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेकांनी घरांचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमध्ये बांधकाम साहित्य विक्रीची हार्डवेअर दुकाने बंद झाली. त्यामुळे बांधकाम रखडले होते. दुकाने सुरू होताच सर्वाधिक गर्दी याच दुकानांमध्ये दिसून आली. दरातही मोठी वाढ झाली होती.गॅरेजसमोर नादुरूस्त वाहनांच्या रांगादीड महिन्यांपासून बिघडलेली वाहने घरीच अडगळीत पडून होती. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर निघण्याचा प्रश्न नव्हता. मात्र, सोमवारी निर्बंध उठताच शेकडो नागरिकांनी दुरूस्तीसाठी गॅरेजसमोर वाहनांची रांग लावल्याचे पाहायला मिळाले.

टॅग्स :Marketबाजार