शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

केरोसीनअभावी नागरिकांंना अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:00 IST

देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली.

ठळक मुद्देकेरोसीन पुरवठा करावा : दिवाबत्ती व कंदीलचा वापर बंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : दारिद्र्यरेषेखालील जनतेचे जीवनमान सुधारावे, या उद्देशाने शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येतात. त्याचा मोठा गाजावाजा करण्यात येतो. मात्र, अनेक योजना बंद करण्यात आल्या आहे. त्यातच शिधापत्रिकेवर मिळणारे केरोसीन बंद झाल्याने घराघरांत जळणारा दिवा, कंदील नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.देशात प्रदूषणमुक्त वातावरण राहावे, चुलीमुळे धूर पसरुन महिलांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. लाखो महिलांना आपला जीवसुद्धा गमवावा लागला आहे. त्यामुळे शासनाने पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना कार्यान्वित करुन घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचविला. पण यामुळे केरोसीनवर बंदी घालण्यात आली. गॅस सिलिंडरचे भाव गगनाला भिडले असल्याने शेवटी गरीब जनता सरपण गोळा करुन स्वयंपाक शिजिवत असल्याचे चित्र दिसत असल्याने सदर योजना फोल ठरल्याचे दिसून येत आहे. सरपण पेटविण्यासाठी केरोसीनची आवश्यकता आहे. केरोसीन मिळविण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. सध्या धानाची कापणी, मळणी सुरु आहे. खेडेगावात शेतकरी शेतात जागल करण्यासाठी केरोसीनचा दिवा, कंदीलचा वापर करतात. मात्र, केरोसीन बंदीमुळे शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या थोडी हवा जरी आली तरी महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा बंद केला जातो. त्यामुळे खेड्यातील जनतेला वीज येईपर्यंत अंधाराचा सामना करावा लागतो. केरोसीन बंदीमुळे दिवा, कंदीलचा उपयोग होताना दिसत नाही. शेतीच्या कामाकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर शेतीपयोगी यंत्र पुरविण्यात आले. त्यात काही यंत्र केरोसीनवर चालणारे आहे. मात्र, केरोसीन मिळत नसल्याने ते यंत्रदेखील धूळखात पडले आहेत. रात्रीच्या वेळेस दिवा कंदील घरात चालू असल्याने चोरीच्या प्रमाणातसुद्धा घट दिसून येत होती. मात्र, केरोसीन बंदीमुळे गरिबांच्या घरचा दिवा, कंदील नामशेष होत आहे. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिकांना अडचणींना सामोर जावे लागत आहे.सरण पेटविण्यासाठी केरोसीन मिळेनाअंत्यसंस्काराच्या वेळेस सरण पेटविण्यासाठी केरोसीनचा वापर केला जात होता. मात्र केरोसीनचा पुरवठा जवळपास बंदच केल्याने मृताच्या नातेवाईकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. केरोसीनऐवजी डिझेलचा वापर करतो म्हटल्यास ते परवडण्याजोगे नाही. त्यामुळे शासनाने केरोसीनचा पुरवठा पूर्ववत सुरु करावा, अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक