जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला

By Admin | Updated: May 31, 2015 01:55 IST2015-05-31T01:55:10+5:302015-05-31T01:55:10+5:30

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. कल्याणकुमार यांनी शनिवारी दुपारी पदभार स्वीकारला. आशुतोष सलील यांची ..

Chief Executive Officer of Zilla Parishad took charge | जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला

सलील वर्धेला रवाना : सूत्रे हाती घेतली
चंद्रपूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. पी. कल्याणकुमार यांनी शनिवारी दुपारी पदभार स्वीकारला.
आशुतोष सलील यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली असून त्यांनीही आज शनिवारीच पदाची सूत्रे हाती घेतली.
नवे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याणकुमार चंद्रपूरला येण्यापूर्वी राज्य खनिकर्म महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नागपुरात कार्यरत होते. आज पदभार स्विकारल्यानंतर वित्तमंत्र्यांनी बोलाविलेल्या बैठकांना त्यांनी उपस्थिती लावली. जिल्हाधिकारी कार्यालयात वित्तमंत्र्यांशी झालेल्या वार्तालापादरम्यान, आपण प्रथमच चंद्रपुरात आल्याचे त्यांनी सांगितले. खनिकर्म विभागातंर्गत सुरू असलेल्या सुमारे अडीचशे कोटी रूपयांचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे त्यांच्या चर्चेतून जाणवले. चंद्रपुरात बदली झाल्याने कार्यन्वित केलेल्या खनिकर्म विभागातील योजना सोडून ते चंद्रपुरात रूजू झाले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Chief Executive Officer of Zilla Parishad took charge