चंद्रपूर शहरात अस्वल घुसल्याने नागरिक दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:01:03+5:30

येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अनेकांनी विरोध केल्यानंतरही एकाने जीवावर बेतून तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती रेल्वे रुळावरून बसस्थानक परिसरात पळून गेली.

In Chandrapur city the people were in danger of entering a bear | चंद्रपूर शहरात अस्वल घुसल्याने नागरिक दहशतीत

चंद्रपूर शहरात अस्वल घुसल्याने नागरिक दहशतीत

Next
ठळक मुद्देरात्रभर शहरात : वनविभाग, इको-प्रो सदस्यांनी राबविली शोधमोहिम

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सोमवारी रात्री एका अस्वलाने शहरात प्रवेश करून नागरिकांची धडकी वाढविली. रात्रभर अक्षरश: तिने शहर पिंजून काढले. दरम्यान, वनविभाग, इको प्रो, पोलीस प्रशासनाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिकांच्या अतिउत्साहीपणामुळे प्रत्येकवेळी हुलकावणी देत, दाताळा रोड परिसरातील नदीपात्रातून ती जंगलात पळून गेल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
येथील संजय गांधी मार्केट परिसरातील एका दुकाना समोरील भागात सोमवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान अस्वल असल्याचे नागरिकांना दिसले. त्यानंतर या परिसरातील गर्दी करायला सुरुवात केली. एक-एक करीत मोठी गर्दी झाल्याने पोलीस प्रशासनही घटनास्थळी पोहचले. दरम्यान, अनेकांनी विरोध केल्यानंतरही एकाने जीवावर बेतून तिला हाकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ती रेल्वे रुळावरून बसस्थानक परिसरात पळून गेली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक लमकावार, आरएफओ राहूल कारेकर, वनकर्मचारी, वनरक्षक, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे, इको-प्रोे वन्यजीव रक्षक दलाचे सदस्यांसोबतच दंगा नियंत्रक पथक आदी येथे पोहचले. मात्र अंधारामध्ये ती पळून जाण्यात यशस्वी झाली. मात्र दुकानाचा गाळा ते रुळापर्यंतचा तिचा प्रवास काही नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. ती इरई नदीच्या मार्गाने गेल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. त्यानंतर वनविभाग तसेच इको- प्रोच्या सदस्यांनी शोध मोहिम सुरु केली असता ती कृषी विभाग कार्यालयाकडे गेली. त्यानंतर परत संजय गांधी मार्केट परिसरात आली. मात्र नागरिकांच्या गर्दीमुळे ती सैरावैरा पळू लागली. दरम्यान, विश्रामगृहाच्या मागील बाजूला असलेल्या शासकीय निवासस्थान परिसरात ती पोहचली. बाजूच्या शासकीय वसाहत असलेल्या कॉलनीमध्ये गेल्यानंतर पथकाने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळीही यश आले नाही. त्यानंतर मेडीकल कॉलेज परिसरात सिंधीकॉलनी, सिंधी ग्राऊंड तिथून रेव्हणी कॉलनी परिसरात पोहचली. मात्र येथेही नागरिकांचा अतिउत्साह बघायला मिळाला. बॅटरी तसेच लाढीकाढी घेऊन पळवून लावण्याचा प्रयत्न केल्याने एका झाडाचा आसरा घेत ती चांदा पब्लिक स्कूल परिसरात पोहचली. त्यानंतर इंगिरा गांधीस्कूल, कृषी उत्पन्न बाजार समिती, जीवन ज्योती कॉलनी परिसरातून पहाटे ३.३० वाजताच्या दरम्यान ती दाताळा मार्गे इरई नदीच्या पात्रात गेली. त्यानंतर रेस्क्यू टिमने आपली शोधमोहिम बंद केली. माहिती होताच आ. किशोर जोरगेवार यांनी संजय गांधी मार्केट तर जगन्नाथबाबा परिसरात उपमहापौर राहुल पावडे यांनी यासंदर्भात माहिती घेत शांतता पाळण्याचे आवाहन केले.

एकाने घातला जीव धोक्यात
संजय गांधी मार्केट परिसरात अस्वल दिसताच एका नागरिकाने अक्षरश: तिच्या जवळ जावून हाकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मात्र तो सुदैवाने तो थोडक्यात बचावला.

Web Title: In Chandrapur city the people were in danger of entering a bear

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.