शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक माहिती सादर केली. घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना त्यांनी केल्या.

ठळक मुद्देनगरविकास राज्यमंत्री : गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनीच उत्तम काम केले आहे. पुढच्या काळामध्ये देखील असेच काम ठेवून कोरोना संसर्गाची साखळी खंडित करणे गरजेचे आहे. कोरोनाचा उद्रेक होणार नाही यासाठी नियोजन करावे. अशा सूचना राज्याचे नगर विकास, ऊर्जा, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, आदिवासी विकास, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी गडचांदूर येथे दिल्यात. गडचांदूर नगर परिषदेत कोरोना विषयक आढावा बैठकीत ते बोलत होते.गडचांदूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके यांनी नगरपरिषद अंतर्गत आतापर्यंत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना विषयक माहिती सादर केली.घरकुल योजना तसेच इतरही विकासात्मक योजना रखडू देऊ नये, घनकचऱ्यासाठी जागा उपलब्ध करण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करावी,अशा सूचना त्यांनी केल्या.यावेळी आमदार सुभाष धोटे, नगराध्यक्षा सविता टेकाम, नगर परीषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी, उपविभागीय अधिकारी जे.पी लोंढे, तहसीलदार महेंद्र वाकलेकर, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळके, राजेंद्र वैद्य तसेच नगरपरिषद, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.कोरपना तालुक्यात कोविड केअर सेंटर, बाहेरून येणाºया नागरिकांची आरोग्य तपासणी व नोंदणी, आरोग्य संदर्भातील सर्वेक्षण, कोरोना विषयक जनजागृती याविषयीची केलेली कार्यवाही तहसीलदार महेंद्र वाकलेकर यांनी विषद केली.आरोग्य विभागाने बाधितांवर करण्यात येणारे उपचार तसेच उपाययोजनांची माहिती दिली. आरोग्य विभागाने आणखी सक्षमपणे आरोग्य सर्वेक्षण करून बाहेरून येणाºया नागरिकांची नोंद करावी तसेच त्यांना अलगीकरणात ठेवण्याची सूचना ना. तनपुरे यांनी यावेळी आरोग्य विभागाला दिल्या.विकासासाठी निधी मंजूर करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणीगडचांदूर : गडचांदूर शहराच्या विकासासाठी निधी मंजूर करून शहर विकसित करावे, अशी मागणी कोरपना तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना. प्राजक्त तनपुरे यांच्याकडे करण्यात आली.यावेळी घनकचरा व्यवस्थापनाकरिता गडचांदुर दोन हेक्टर जागा मंजूर करा, गडचांदुर ते आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम करा, गुजरी बाजाराकरिता अन्न व नागरी पुरवठा विभागाचे गोडावून उपलब्ध करून द्यावे, आठवड़ी बाजारासाठी स्वतंत्र इमारत करा, प्रधानमंत्री शहरी आवास योजनेतून गडचांदुर ७७ घरकुल धारकांना उर्वरित हप्ता देण्याकरिता निधी उपलब्ध करून द्या, सार्वजनिक सभागृहाची निर्मिती करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा नगर परिषद उपाध्यक्ष शरद जोगी, शहर अध्यक्ष नगरसेविका अश्विनी कांबळे, नगरसेविका मिनाक्षी एकरे आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या