शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयतर्फे खरेदी केंद्र सुरू करणार

By admin | Updated: November 16, 2015 00:56 IST

गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने

शेतकऱ्यांना दिलासा : हंसराज अहीर यांचा पुढाकारचंद्रपूर : गेल्या अनेक वर्षांपासून कापूस उत्पादन शेतकऱ्यांना आवश्यकता असूनही त्यांच्या उत्पादनाची खरेदी करण्याची उपयुक्त व्यवस्था नसल्याने त्यांना त्यांचे उत्पादन खासगी व्यापाऱ्यांना पडेल किंमतीत विकण्याची पाळी येत होती. याची दखल घेत केंद्रीय रसायन व उर्वरक राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी कापूस उत्पादकांना केंद्र सरकारने घोषित केलेल्या किमान बाजारमूल्य भावाने खरेदी केंद्र उपलब्ध करून देवून त्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपक्रम असलेल्या भारतीय कपास निगम लिमिटेडच्या माध्यमाने आपल्या क्षेत्रात कापूस उत्पादकांना त्यांचा कापूस तातडीने विक्री करून देण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादन होत असून या कापूस उत्पादकांना खरेदीची शाश्वती नसल्याने त्यांच्या उत्पादनाच्या खासगी व्यापाऱ्यांकडून अनुचित लाभ घेतल्या जात होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने असे नुकसान टाळून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाच्या किमान बाजारमुल्य भावाचा फायदा मिळावा, याकरिता भारतीय कपास निगम लिमीच्या अध्यक्ष तथा प्रबंध निदेशकांशी प्रत्यक्ष चर्चा करून पूर्व विदर्भातील कापूस उत्पादक क्षेत्रात कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने भारतीय कपास निगम लिमी.ने राजुरा, वरोरा, घाटंजी, पांढरकवडा, कापसी, नांदुरा, वरुड, पुलगाव व वडनेर येथे खरेदी सुरू केली आहे.भारतीय कपास निगमतर्फे सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रात शेतकऱ्यांची कापूस प्रमाणीकरणच्या नावाने कर्मचाऱ्यांनी लूट करू नये, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचा योग्य दर देण्यासाठी भारतीय कपास निगमने आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य आदेश निर्गमीत करावे. कापूस खरेदीत शेतकऱ्यांची कोणत्याही कारणामुळे झालेली फसवणूक यापुढे सहन करण्यात येणार नाही याची दक्षता घेवून कापूस खरेदी शेतकऱ्यांना फायदेशीर व्हावी याकरिता केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी संबंधितांना आवश्यक निर्देश दिले आहेत. (प्रतिनिधी)