शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

२,२०० रुपये किमतीचे बल्ब ६, ५०० रुपयांत

By admin | Updated: December 4, 2015 01:23 IST

तालुक्यातील म्हसली गट ग्रामपंचायतीअंतर्गत मासिक सभेत ठराव न घेता एलईडी बल्ब स्वत: खरेदी करुन पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या फंडातील रकमेची ...

म्हसली ग्रामपंचायीतील प्रकार: एलईडी बल्ब खरेदीत हेराफेरीनागभीड: तालुक्यातील म्हसली गट ग्रामपंचायतीअंतर्गत मासिक सभेत ठराव न घेता एलईडी बल्ब स्वत: खरेदी करुन पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या फंडातील रकमेची हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप उसरपंच मारोती ठाकरे यांनी केला आहे.म्हसली गटग्रामपंचायतीची सप्टेंबर महिन्यात पहिली मासिक सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खरेदी करावयाच्या कोणत्याच विषयावर चर्चा झाली नाही व तसा ठरावही करण्यात आला नाही. मात्र आॅक्टोबर महिन्यात घेण्यात आलेल्या मासिक सभेत ग्रामसेविका ए.आर.भोयर, यांनी एकूण ९५ हजार रुपयांचे १५ नग एलईडी बल्ब खरेदी करण्यात आले म्हणून सांगितले. या सभेत खरेदी केल्याचे बिल, कोटेशन व बल्बसुद्धा दाखविण्यात आले नाहीत. ही खरेदी ऐकून सर्व सदस्य आश्चर्यचकीत झाले. या बल्बची किंमत अंदाजे २६०० पेक्षा जास्त नसावी. सायंकाळ झाल्याने सभा लवकरच गुंडाळण्यात आली. सोबतच मासिक सभेमध्ये सर्व सदस्यांचे उपस्थिती रजिस्टर असते. परंतु उपस्थिती रजिस्टरवर स्वाक्षऱ्या न घेता सरळ सरळ प्रोसीडींग रजिस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्यात. या सभेच्या आठ दिवसानंतर खरेदी केलेल्या १५ नग बल्बपैकी प्रत्यक्ष १३ नग बल्ब तेलीमेंढा व म्हसली गावासाठी पाठविले. उल्लेखनीय असे की, आॅगस्ट १५ मध्येच २८ हजारांची बल्ब खरेदी दाखविण्यात आली आहे.सदर ठराव नोव्हेंबरच्या मासिक सभेमध्ये सर्वानुमते नामंजूर करण्यात आला असून ग्रामसेविकेने स्वत: सर्व सदस्यांना विश्वासात न घेता बल्ब खरेदी केले असल्याचा आरोप आहे. हा प्रकार नियमबाह्य असून पर्यावरण ग्राम संतुलीत योजनेच्या रकमेची अफरातफर आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरुन सखोल चौकशी करुन सदर रक्कम ग्रामपंचायतीला जमा करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)