शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निप्पॉंन डेन्ड्रोच्या जागेवर नवीन प्रकल्प उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:25 IST

भद्रावती : गेल्या २६ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या ११८३.२३ हेक्टर जमिनीवर आतापर्यंत कोणताही प्रकल्प न ...

भद्रावती : गेल्या २६ वर्षांपासून भद्रावती तालुक्यातील वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या ११८३.२३ हेक्टर जमिनीवर आतापर्यंत कोणताही प्रकल्प न झाल्याने ही जागा नवीन प्रकल्पाच्या प्रतीक्षेत आहे. उपरोक्त संपादित जमीन निप्पॉंन डेन्ड्रोच्या नावाने असून, सद्य:स्थितीत महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाच्या ताब्यात आहे.

कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला आवश्यक असलेल्या सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. गुरुवारी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी जमिनीच्या व प्रकल्पाच्या संदर्भातील फाईल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. यावेळी विविध समस्यादेखील धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापुढे ठेवल्या. लवकरच सर्व प्रश्न निकाली काढण्याची ग्वाही त्यांनी दिली.

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील पिपरी, ढोरवासा, तेलवासा, कुंनाडा, टोला, चारगाव, विजासन, लोणार रीठ, रुयाल रीठ व चिरादेवी या गावांतील शेतकऱ्याची ११८३.२३ हेक्टर शेतजमीन १९९४-९५ मध्ये निप्पॉंन डेन्ड्रो वीज प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती.

या प्रकल्पामुळे या परिसरातील बेरोजगारांना रोजगार मिळणार असल्यामुळे हा प्रकल्प त्वरित करण्याची विनंती नगराध्यक्ष धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केली.

त्यासोबतच केसुर्ली व विजापूर येथील शासकीय जागेवर पर्यटनस्थळ व उद्योग उभारणे, त्यासोबतच चंद्रपूर- नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपूर्ण सर्व्हिस रोड व विद्युत व्यवस्था पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली. वरील सर्व प्रश्न त्वरित मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

बॉक्स

येथे आहे जमीन

गेल्या २६ वर्षांपासून उपरोक्त जमिनीवर कोणताही प्रकल्प नाही. जमीन पडीक आहे. संपादित क्षेत्राची अंदाजे लांबी ३५०० मीटर व रुंदी १५०० मीटर आहे. भद्रावती शहरापासून ही जागा सात कि.मी. अंतरावर आहे. मुख्य म्हणजे मोठ्या प्रमाणात कोळसा, वर्धा नदीचे मुबलक पाणी, रेल्वेची मुख्य लाईन, वीज साठविण्यासाठी जवळच असलेले पॉवर ग्रीड, जवळूनच गेलेल्या कचा दाबाच्या विद्युत वाहिन्या या पायाभूत सुविधा या ठिकाणी आहेत. या ठिकाणी प्रकल्प झाल्यास भद्रावती परिसरातील रोजगार निर्मिती होऊ शकते. तसेच बाजारपेठेवरसुद्धा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.