शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

बुद्ध मूर्ती चोरीच्या निषेधार्थ मूल शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 06:00 IST

मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व धम्माचा संदेश घेऊन परत जातात.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : आरोपींंना अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमूल : येथील चंद्रपूर रोडवरील बुद्ध टेकडीवर स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासीक पुरातन गौतम बुद्धाची मूर्ती अज्ञात समाजकंटकानी चोरुन नेली. तसेच बौद्ध भिक्खू संघवंश राहात असलेल्या झोपडीला आग लावली. या घटनेचा निषेधार्थ, तसेच आरोपीला अटक करावी अशी मागणी करीत बौद्ध बांधवातर्फे मूल शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला. यावेळी रॅली काढून सदर कृत्याचा निषेध केला. या संदर्भातील निवेदन तहसीलदार डी. जी. जाधव यांना देण्यात आले.मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व धम्माचा संदेश घेऊन परत जातात. मात्र समाजकंटकांनी मंगळवारी रात्री बुद्ध मूर्ती चोरुन नेली. तसेच तिथे वास्तव्यास असणारे भदंत संघवंश यांची झोपडी जाळण्यात आली. त्यामध्ये त्यांची झोपायची गादी व इतर साहित्य जळाले. याबाबतची माहिती बौद्ध बांधवांना होताच त्यांनी टेकडीवर धाव घेऊन सदर घटनेची पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार केली. दरम्यान बुधवारी सायंकाळी दुसरी मुर्ती बसविण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शहरात बंद पाडण्यात आला. ११ वाजता शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी न.प. मूलचे माजी उपाध्यक्ष विनोद निमगडे, नगरसेविका वंदना वाळके, डोर्लीकर, राजू खोब्रागडे व इतर बौद्ध बांधव उपस्थित होते.सावलीत तहसीलदारांंना निवेदनसावली : मूल येथील बुद्धगिरी टेकडीवरील बुद्ध मुर्ती चोरल्याच्या घटनेचा सावली येथे बौद्ध बांधवातर्फे निषेध करण्यात आला. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांंना देण्यात आले. यावेळी रोशन बोरकर, नितीन दुधे, अ‍ॅड. पी. पी. शेंडे, मदन मेश्राम, वेणू बोरकर, विशाखा गेडाम, सविता सेमस्कार, अंजली दमके, अर्चना थोरात, मीनाक्षी दुधे, सपना दुधे, मनोरमा गेडाम, गीताबाई बाबनवाडे, अक्षता दुधे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Thiefचोर