बुद्ध मूर्ती चोरीच्या निषेधार्थ मूल शहरात कडकडीत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 06:00 AM2019-08-23T06:00:00+5:302019-08-23T06:00:47+5:30

मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व धम्माचा संदेश घेऊन परत जातात.

Buddhist city closed tightly in protest against the theft of idols | बुद्ध मूर्ती चोरीच्या निषेधार्थ मूल शहरात कडकडीत बंद

बुद्ध मूर्ती चोरीच्या निषेधार्थ मूल शहरात कडकडीत बंद

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : आरोपींंना अटक करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : येथील चंद्रपूर रोडवरील बुद्ध टेकडीवर स्थापन करण्यात आलेल्या ऐतिहासीक पुरातन गौतम बुद्धाची मूर्ती अज्ञात समाजकंटकानी चोरुन नेली. तसेच बौद्ध भिक्खू संघवंश राहात असलेल्या झोपडीला आग लावली. या घटनेचा निषेधार्थ, तसेच आरोपीला अटक करावी अशी मागणी करीत बौद्ध बांधवातर्फे मूल शहरात कडकडीत बंद पाडण्यात आला. यावेळी रॅली काढून सदर कृत्याचा निषेध केला. या संदर्भातील निवेदन तहसीलदार डी. जी. जाधव यांना देण्यात आले.
मूल येथील बुद्ध टेकडीवर ४ नोव्हेंबर २०१४ ला मुर्तीची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून बौद्ध सणांच्या दिवशी विविध कार्यक्रम पार पडतात. त्यामुळे सदर स्थळ बौद्ध धर्मियांसाठी प्रेरणास्थान आहे. विदर्भातील बौद्ध बांधव येथे मोठ्या संख्येने येत असून शांती व धम्माचा संदेश घेऊन परत जातात. मात्र समाजकंटकांनी मंगळवारी रात्री बुद्ध मूर्ती चोरुन नेली. तसेच तिथे वास्तव्यास असणारे भदंत संघवंश यांची झोपडी जाळण्यात आली. त्यामध्ये त्यांची झोपायची गादी व इतर साहित्य जळाले. याबाबतची माहिती बौद्ध बांधवांना होताच त्यांनी टेकडीवर धाव घेऊन सदर घटनेची पोलीस स्टेशन मूल येथे तक्रार केली. दरम्यान बुधवारी सायंकाळी दुसरी मुर्ती बसविण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी गुरुवारी शहरात बंद पाडण्यात आला. ११ वाजता शहरातून निषेध रॅली काढण्यात आली. त्यानंतर निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी न.प. मूलचे माजी उपाध्यक्ष विनोद निमगडे, नगरसेविका वंदना वाळके, डोर्लीकर, राजू खोब्रागडे व इतर बौद्ध बांधव उपस्थित होते.

सावलीत तहसीलदारांंना निवेदन
सावली : मूल येथील बुद्धगिरी टेकडीवरील बुद्ध मुर्ती चोरल्याच्या घटनेचा सावली येथे बौद्ध बांधवातर्फे निषेध करण्यात आला. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांंना देण्यात आले. यावेळी रोशन बोरकर, नितीन दुधे, अ‍ॅड. पी. पी. शेंडे, मदन मेश्राम, वेणू बोरकर, विशाखा गेडाम, सविता सेमस्कार, अंजली दमके, अर्चना थोरात, मीनाक्षी दुधे, सपना दुधे, मनोरमा गेडाम, गीताबाई बाबनवाडे, अक्षता दुधे आदी उपस्थित होते.

Web Title: Buddhist city closed tightly in protest against the theft of idols

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर