शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

भीमसैनिकांच्या मानवंदनेनंतर बुद्ध-भीम अस्थिकलश रॅली

By admin | Updated: October 17, 2016 00:44 IST

६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती ..

समता सैनिक दलाचे पथसंचलन : ब्रह्मदेशातील भिक्खू संघाची उपस्थिती चंद्रपूर : ६० व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यानिमित्त स्थानिक गोलबाजारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशांची भव्य मिरवणूक रविवारी सकाळी काढण्यात आली. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पथसंचलन केले. त्यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.‘बौद्ध धम्म चिरायू हो’, ‘डॉ. बाबासाहेबांचा जयजयकार हो’, अशा विविध घोषणा देत सकाळी ११.३० वाजता मिरवणूक प्रारंभ झाली. मिरवणुकीचे संचालन समता सैनिक दलाचे समता सैनिक करीत होते. त्यांच्या मागे भारतीय बौद्ध महासभेचे उपासक-उपासिका रांगेमध्ये चालत होत्या. या मिरवणुकीत पांढरा गणवेश घातलेले महिला, पुरुष व बालके सहभागी झाले होते. चंद्रपूर शहरातील विविध वस्त्यांमधून स्त्री-पुरुषांचे जत्थे मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणूक जटपुरा गेट मार्गाने निघाली. पांढऱ्या गणवेशातील मिरवणूक शांततेचा संदेश देत पुढे जात होती. ही मिरवणूक पाहण्याकरिता रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी झाली होती. जटपुरा गेट, पाण्याची टाकीमार्गे मिरवणूक दीक्षाभूमी येथे पोहोचली. तेथे भव्य स्वागत करण्यात आले.आंबोरा येथून डॉ. नंदवर्धन बोधी महाथेरो यांनी तथागत बुद्धाचा अस्थिकलश आणला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीने फुलांची सजविलेल्या रथावर डॉ. आंबेडकर यांचा अस्थिधातू कलश आणला. त्यानंतर गौतम बुद्ध आणि डॉ. आंबेडकर यांचे अस्थिकलश रथावर एकत्र ठेवण्यात आले. रथावर प्रा. डॉ. नंदवर्धनबोधी महाथेरो, मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरूण घोटेकर, ब्रह्मदेशातील भिक्खु संघ आदी स्थानापन्न होते. तत्पूर्वी समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सहसंघटक सुनील सारीपुत्त यांच्या नेतृत्वात समता सैनिकांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला मानवंदना दिली. यावेळी दलाचे महाराष्ट्र बौध्दिक प्रमुख भास्कर कांबळे, प्रमुख प्रशिक्षक मार्शल रंगारी, मार्शल पुणेकर, मार्शल खरतडे, मार्शल अश्विनी कांबळे, मार्शल प्रवीण कांबळे, मार्शल दीक्षा सोनकांबळे, जिल्हाध्यक्ष शिवचंद्र नागदेवते, प्रदीप डोंगरे, युवराज बडगे यांनी पथसंचलनाचे नियंत्रण केले. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मुनेश्वर गजभिये यांच्या नेतृत्त्वात पांढऱ्या गणवेशातील सदस्य सहभागी झाले. दि ब्लू मिशन ट्रस्टतर्फे अल्का मोटघरे आणि सदस्यांनी ब्रह्मदेशातील भिक्खु संघाला चिवरदान केले.