लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.मनपाने अन्यायकारक कर लागू करून ग्राहकांची फसवणूक करीत आहेत. शोरूम संचालक व मनपा अधिकारी व सीएच्या संगनमताने गैरव्यवहार करण्यात आला. याचे पुरावे देऊनही मनपा अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने केला आहे. आंदोलनाचे नेतृत्व विदर्भ प्रदेश महासचिव राजू झोडे, मोनल भडके यांनी केली. या आंदोलनात संजय बोधे नभिलास भगत, संजय मगर, अनुकुल शेंडे, गुरू भगत, राजु रामटेके,अशोक रामटेके, जे. डी. रामटेके, महेंद्र झाडे, चंद्रकांत माझी,विजय गोंडाने आदींसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:23 IST
मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुरू असलेल्या अन्यायाविरुद्ध बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन
ठळक मुद्देअन्यायाकडे वेधले लक्ष : दुचाकी शोरूमसमोरही निदर्शने