ब्रह्मपुरीत क्रीडा संस्कृतीला चालना

By Admin | Updated: December 17, 2015 01:15 IST2015-12-17T01:15:41+5:302015-12-17T01:15:41+5:30

सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोसिएशनतर्फे ब्रह्मपुरी येथे राज्यातील नामवंत खेळाडू ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान स्पर्धेसाठी ...

Bringing sports culture in Brahmaputra | ब्रह्मपुरीत क्रीडा संस्कृतीला चालना

ब्रह्मपुरीत क्रीडा संस्कृतीला चालना

सन्मित्र बॉस्केटबॉल स्पर्धा : राज्यस्तरीय खेळाडूंना आमंत्रण
ब्रह्मपुरी : सन्मित्र क्रीडा मंडळ व चंद्रपूर जिल्हा बॉस्केटबॉल असोसिएशनतर्फे ब्रह्मपुरी येथे राज्यातील नामवंत खेळाडू ३० डिसेंबर ते २ जानेवारीदरम्यान स्पर्धेसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गोसिखुर्द विश्रामगृहात आयोजित पत्रपरिषदेत मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार प्रा. अतुल देशकर यांनी दिली आहे.
पत्रपरिषदेमध्ये माहिती देताना प्रा. अतुल देशकर म्हणाले, ब्रह्मपुरी ही क्रीडा नगरी असून ब्रह्मपुरीचे खेळाडू राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर खेळले व प्रतिनिधीत्व केले आहे. या निमित्याने ब्रह्मपुरीत राज्यातील नामवंत खेडाळूस बोलावून क्रीडा नगरीत खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचा या मंडळाचा हेतू आहे. ही स्पर्धा पुरुष, महिला व बाल (१४ वर्षाखाली) अशा तीन गटात विभागली असून रोख पारितोषिके, चषक, ट्राफीज, उत्कृष्ठ खेळाडूंना विशेष पुरस्कार असे अंदाजे एक लाख पन्नास हजार रुपयांचे बक्षिसे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत भारतीय नौसेना, इंडियन जिमखाना मुंबई, सेंट्रल रेल्वे मुंबई, पुणे, नाशिक, सोलापूर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, अकोला, चंद्रपूर इत्यादी नामवंत संघ भाग घेणार आहेत. डेप्युटी इन्सेक्टर जनरल आॅफ आॅफीसर राजेश कांबळे व सेल्स डायरेक्टर मिडल इस्ट अ‍ॅट आॅफ्रीका आशिष जगनाडे या दोन माजी खेळाडूंना गौरविण्यात येत आहे. या संपूर्ण स्पर्धेकरिता खासदार अशोक नेते, जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले, आमदार विजय वडेट्टीवार, रिता उराडे, धनंजय वेरुळकर, शत्रूघ्न गोखले, सिमा अहिरे, रिना जनबंधू, आमदार मितेश भांगडिया, आमदार अनिल सोले, आमदार संजय धोटे, मनोहर पाऊणकर, विजय संतान आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. पत्रपरिषदेला प्रा. डॉ. अश्वीन चंदेल, प्रा. प्रकाश आयदे, दीपक उराडे, अतुल गौरशेट्टीवार, अन्वर शेख, परेश शहादाणी, पवन जयस्वाल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bringing sports culture in Brahmaputra