शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

छोट्याशा खोलीत गुदमरतोयं चिमुकल्यांचा श्वास

By admin | Updated: February 22, 2015 00:53 IST

उमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन...

नितीन मुसळे सास्तीउमलत्या कळ्यांना योग्य वातावरणासोबत खतपाणी मिळाल्यास चांगली फुले निर्माण होतात, त्याच प्रमाणे लहान अज्ञान बालकांना चांगल्या वातावरणात चांगले संगोपन होऊन योग्य धडे मिळाल्यास भविष्यात एक सुंदर पिढी निर्माण होण्यास मदत होते. त्याकरिता शासनाच्या वतीने विविध भागात आंगणवाड्या चालविल्या जात आहेत. परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारत नाही. भाड्याच्या आणि अतिशय छोट्या खोल्यांमध्ये चिमुकल्यांना धडे गिरवावे लागत आहे. या छोट्या खोल्यांमध्ये बालकांचा श्वास गुदमरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.राजुरा- कोरपना तालुक्याच्या सीमेवरील जैतापूर येथे दहा वर्षांपासून लहान बालकांना एका लहानग्या पडक्या इमारतीत बाळकडू पाजल्या जात होते. परंतु दिर्घ प्रतीक्षेनंतर एक सुसज्ज इमारत मिळाली. परंतु त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने आजही लहान बालके लहानग्या खोलीत आपले भविष्य घडवित आहे. कोरपना तालुक्यांंतर्गत असलेल्या नांदगाव ग्रामपंचायतीत जैतापूर येथील अंगणवाडी पाणलोट क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या एका अरुंद खोलीत मागील तीन वर्षांपासून अंगणवाडी सुरू आहे. याठिकाणी शासनाच्या वतीने सन २०१३ मध्ये अंगणवाडी इमारतीचे बांधकाम करण्यात आले. आज बांधकाम होऊन एक वर्षाचा कालावधी लोटला असूनही त्या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त सापडत नसल्याने इमारत रिकामी पडलेली आहे. रिकाम्या पडलेल्या या नवीन इमारतीत गावात कामासाठी येणारे कामगार निवासासाठी आसरा घेत आहेत. उद्घाटनापूर्वीच इमारतीची फरशी फुटलेली आहे तर खिडक्यांची तावदानेसुद्धा तुटलेले असून उद्घाटनाअभावी इमारतीची दुरावस्था होत असल्याचे दिसून येत आहे.मागील दहा वर्षांपासून पडक्या अंगणवाडीच्या इमारतीत लहान बालकांना आपले लहानपणीचे शिक्षण घ्यावे लागले आणि आज इमारत असूनसुद्धा दहा बाय पंधरा फुट क्षेत्रफळ आकाराच्या खोलीत शिक्षण घ्यावे लागत आहे. या गंभीर प्रकाराकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. ज्या ठिकाणी लहान बालकांना श्वास गुदमरतो, त्याच ठिकाणी त्यांना बाळकडू घ्यावे लागत आहे. शासन गोरगरीब जनतेच्या कल्याणाचे हित समोर ठेवून करोडो रुपयांच्या योजना आखत असते. परंतु प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शासनाच्या करोेडो रुपयांच्या योजनांची योग्य अंमलबजावणी होत नसल्याने त्या निर्रथक ठरत आहे.