शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

७३ आदिवासी विद्यार्थ्यांच्या इंग्रजी शिक्षणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येते. सत्र सुरु होण्याच्या पूर्वी अर्ज मागणविण्यात येतात. त्यानुसार कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्यात येतो.

ठळक मुद्देनव्या सत्राच्या प्रवेशाला स्थगिती : पालकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्याना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली व दुसरीत शिक्षण देण्याच्या योजनेला २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे चिमूर व चंद्रपूर प्रकल्पातील सुमारे ७३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याची योजना सन २०१०-११ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळांमध्ये दरवर्षी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येते. सत्र सुरु होण्याच्या पूर्वी अर्ज मागणविण्यात येतात. त्यानुसार कागदपत्राची तपासणी केल्यानंतर त्यांना संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रवेश देण्यात येतो. त्यानुसार चिमूर प्रकल्पातील ६१ व चंद्रपूर प्रकल्पातील १२ असे एकूण ७३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. कोरोना रोगाच्या साथीच्या पार्श्वभूमीवरील वित्त विभागाच्या सूचना लक्षात घेता कोणत्याही अतिरिक्त निधी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देण्याच्या योजनेसाठी उपलब्ध होणार नाही. ही शक्यता लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाकडून २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे या योजनेला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये नवीन शाळेची निवड करण्यात येणार नसून तसेच या पूर्वी निवडलेल्या शाळांमध्येही नवीन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, आदिवासी विकास आयुक्त व प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. शैक्षणिक वर्षामध्ये या योजनेंतर्गत आतापर्यंत निवडलेल्या शाळांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रवेश व शिक्षण पूर्वीप्रमाणेच राहणार आहेत.आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्यायआदिवासी विद्यार्थ्यांचे इंग्रजी शिक्षणांचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांना सदर योजना सोईची होती. मात्र आता कोरोना बजेटचा विचार करता सदर योजनेला सन २०२०-२०२१ या शैक्षणिक सत्रासाठी स्थगिती देण्यात आली. त्यामुळे पालकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.चिमूर प्रकल्पातंर्गत ६१ विद्यार्थी आहेत. ते विद्यार्थी जांभूळघाट येथे शिक्षणासाठी जाण्यास तयार असतील. तर त्यांची तेथे व्यवस्था करण्यात येईल.- केशव बावणकर,आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चिमूर

टॅग्स :Schoolशाळा