शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:35 IST2021-06-09T04:35:48+5:302021-06-09T04:35:48+5:30

चंद्रपूर: इंदिरा नगर संभाजी ब्रिगेड शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे इंदिरा नगर ...

Blood donation camp on the occasion of Shiv Rajyabhishek Day | शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिर

चंद्रपूर: इंदिरा नगर संभाजी ब्रिगेड शाखेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे इंदिरा नगर येथील तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय येथे आयोजन करण्यात आले होते.

रक्तदान शिबिरात एकूण २७ कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील ब्लड बँक विभागाची चमू उपस्थित होती. शिबिराचे उद्घाटन संभाजी ब्रिगेडचे विभागीय कार्यध्यक्ष रवी आसुटकर तसेच बाळकृष्ण बोपचे, सुचित शेंडे, संभाजी ब्रिगेड महानगरचे अध्यक्ष ॲ़ड. मनीष काळे, विनोद थेरे, एकनाथराव ढुमणे, पंकज चटप आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे राज्यनेते प्रा. दिलीप चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष भोयर, शंकर लोनगाडगे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी संजय नैताम, गोमदेव थेरे, स्वप्निल क्षीरसागर, प्रवीण मुलतकर, साजिद शेख, वसंत दुरुटकर, सागर खामनकर, सुरज रासेकर, केतन पाचपुते, मोरेशवर कुरेकर, विक्की बोरकर, शुभम बोबडे, पंकज चटप आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Blood donation camp on the occasion of Shiv Rajyabhishek Day