भिसी येथे आज लोकमतचे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:20 IST2021-07-10T04:20:42+5:302021-07-10T04:20:42+5:30

लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यभर रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने भिसी येथील श्री विठ्ठल-रुख्माई देवस्थानातील सभागृहात शनिवार, ...

Blood donation camp of Lokmat today at Bhisi | भिसी येथे आज लोकमतचे रक्तदान शिबिर

भिसी येथे आज लोकमतचे रक्तदान शिबिर

लोकमत वृत्तपत्र समूहाने राज्यभर रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू केला आहे. त्या अनुषंगाने भिसी येथील श्री विठ्ठल-रुख्माई देवस्थानातील सभागृहात शनिवार, दि. १० जुलै रोजी लोकमत वृत्त समूह, जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व धनराज मुंगले मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शिबिराचे उद्घाटन भिसीचे पोलीस निरीक्षक मनोज गभणे यांच्या हस्ते होईल. अध्यक्षस्थानी विठ्ठल-रुख्माई देवस्थान कमिटीचे अध्यक्ष गरिबा निमजे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून विठ्ठल-रुख्माई देवस्थान कमिटीचे सचिव मनोहर मुंगले, डॉ. प्रियंका कष्टी, विना अहेर उपस्थित राहणार आहेत.

नागरिकांनी या रक्तदान शिबिरात उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन लोकमत सखी मंच संयोजिका दीपाली नेरलवार, धीरज मुंगले, ज्ञानेश्वर शिरभय्ये, प्रा. आनंद भिमटे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हा सचिव ईश्वर डुकरे, सारंग भिमटे, हरीश कामडी यांनी केले आहे. रक्तदान करण्यासाठी नोंदणी करण्याकरिता खालील क्रमांकावर संपर्क करावा.

ज्ञानेश्वर शिरभय्ये : ९७६७६६०४११,

आनंद भिमटे : ७२४८९३५३२६.

Web Title: Blood donation camp of Lokmat today at Bhisi