शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गोंडपिपरीत भाजपचा ऐतिहासिक विजय

By admin | Updated: February 24, 2017 01:20 IST

जि.प. व पं.स. च्या आज झालेल्या मतमोजणीत भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे.

आकाश चौधरी  गोंडपिपरी जि.प. व पं.स. च्या आज झालेल्या मतमोजणीत भाजपाने दणदणीत विजय मिळविला आहे. पंचायत समितीसाठी ६ तर जि.प. साठी ३ उमेदवार भाजपाने निवडून आणत एकहाती सत्ता मिळविली आहे. गोंडपिपरी तालुक्याच्या या ऐतिहासिक निकालाने चक्क पंचायत समितीवर भाजपचा झेंडा फळकणार आहे. या निवडणुकीच्या निकालाने काँग्रेसला गोंडपिपरी तालुक्यात जबर धक्का बसला आहे.गोंडपिपरी तालुक्यातील तीन जिल्हा परिषद व सहा पंचायत समिती गणासाठी क्रीडा संकुलात मतमोजणी करण्यात आली. या निकालाने अनेक जणांना फटका बसला. या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसला खाताही खोलू दिला नाही. या निवडणुकीसाठी आजी-माजी आमदारांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र आमदार सुभाष धोटे यांचे प्रयत्न अयशस्वी ठरले. भाजपाने चक्क जिल्हा परिषदेच्या तीन व पंचायत समितीचे सहाही उमेदवार विजयी झाले. यात करंजी धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या भाजपाच्या उमेदवार स्वाती वडपल्लीवार यांनी काँग्रेसच्या सुरेखा निमगडे यांचा पराभव करत ४९३८ मतांनी निवडून आल्या. तर धाबा-तोहोगाव जिल्हा परिषद क्षेत्रात पार्सल विरूद्ध नारा चांगलाच गाजला आणि भाजपच्या पार्सल उमेदवार वैष्णवी बोडलावारच ७१३३ मते घेत काँग्रेसच्या माधुरी सातपुते यांचा २५३३ मतांनी पराभव केला. विठ्ठलवाडा भं. तळोधी गटात अपक्ष उमेदवार सपना अवथरे यांनी भाजपच्या कल्पना अवथरे यांना चांगलीच टक्कर दिली. मात्र भाजपच्या कल्पना अवथरे यांनी अपक्ष सपना अवथरे यांचा ४८० मताची आघाडी घेत पराभव केला. करंजी पंचायत समिती गणासाठी भाजपच्या भूमी पिपरे यांनी संघटनेच्या रोहिनी कवठे यांचा ४० मतांनी पराभव करत विजय मिळविला. तर काँग्रेसच्या दिपाली कुनघाडकर यांना १२४२ मतावरच समाधान मानावे लागले. धानापूर गणात भाजपचे मनिष वासमवार यांनी २६३८ मते मिळवित काँग्रेसचे प्रविण कांबळे यांचा ६७१ मतांनी पराभव केला. विठ्ठलवाडा गणाच्या भाजपच्या उमेदवार कुसुम ढुमने यांनी २५११ मते घेत काँग्रेसच्या लताबाई पिंपळकर ७३३ मतांनी पराभव केला. भंगाराम तळोधी गणात भाजपच्या सुनिता येग्गेवार यांना ३०९० मते मिळाली तर काँग्रेसच्या संगिता झाडे यांना २२४३ मते मिळाल्याने भाजपच्या सुनिता येग्गेवार यांनी बाजी मारली.