शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावती-वरोरा मतदारसंघ समस्यांच्या विळख्यात

By admin | Updated: February 15, 2016 01:06 IST

भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे.

नागरिकांना विकासाची प्रतीक्षा : लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावेमाजरी : भद्रावती व वरोरा हे दोन तालुके मिळून बनलेला वरोरा विधानसभा मतदार संघ राज्याच्या स्थापनेच्या ५५ वर्षानंतरही उपेक्षीत आहे. बहुतांशवेळा या मतदारसंघातून जे प्रतिनिधी निवडून गेले त्यांच्याच किंवा मित्र पक्षाची राज्यात सत्ता आली. तरीही या मतदार संघाचा अपेक्षीत विकास साधला गेला नाही. मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यंत नजर टाकली तर हा मतदार संघ समस्यांच्या विळख्यात दिसून येते. आता शासन दरबारी वरोरा विधानसभाक्षेत्र अशी ओळख आहे. यापूर्वी या मतदार संघाचे नाव भद्रावती होते. या मतदार संघाचे केवळ नाव (शहराचे) बदलवून शासनाने काय साध्य केले, हे अद्यापही कळू शकलेले नाही. नाव बदलविण्यापेक्षा विकास गंगा वाहू लागली असती तर जनतेला लाभाचे ठरले असते. या मतदार संघातील कित्येक गावात सरकारी एसटी पोहचली नाही. नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी ग्रामस्थांना मिळत नाही. शेत सिंचनाची आवश्यकतेप्रमाणे सोय नाही. भद्रावती व वरोरा दोन्ही तालुके प्रदूषणाने ग्रासले आहेत.भद्रावती आणि वरोरा तालुक्यात नदी- नाले असून सुद्धा जनता व शेती मात्र ताहनलेलीच आहे. या विधानसभा क्षेत्रातील प्रदूषण अवाक्याबाहेर गेले आहे. मात्र यावर योजना व उपाय केवळ कागदोपत्रीच दखविले जातात. ग्रामीण क्षेत्रात स्थानिक पातळीवर मुलभूत सुविधा नसल्यने ग्रामीण क्षेत्रात काम करणारे अधिकारी- कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे मतदारसंघातील नागरिक शासनाकडे आश्वासक विकासाच्या नजरेने पाहत आहे.वरोरा-भद्रावती मतदार संघाअंतर्गत ग्रामीण कित्येक रस्त्यालगत साधे प्रवाशी निवारे नाही. कित्येक ठिकाणची प्रवाशी निवारे जीर्णावस्थेत आहेत. काही निवाऱ्यात किंवा समोरील जागेवर अतिक्रमण झाले आहे. ग्रामीण भागातील विजेच्या खेळ खंडोबाने ग्रामस्थ त्रस्त आहेत. अनेक गावात पाण्याचा प्रश्न आजही भेडसावत आहे. १४ आॅक्टोबर २०१४ ला विधानसभाची सार्वत्रीक निवडणूक झाली. प्रतिनिधी व सरकार बदलले. त्यामुळे जनतेच्या विकासाच्या अपेक्षा वाढल्या. केंद्रात व राज्यात सरकार चालविणारे आमदार- खासदार सत्ताधारीपक्षाचेच आहेत. यामुळे विकास कामासाठी व योजना राबविण्यासाठी निधीची वानवा राहणार नाही, अशी मतदारांची अपेक्षा आहे.सध्या स्थितीचा आढावा घेतला असता विकास कामांअभावी मतदार संघ भकास झाला आहे, असे म्हणण्याची पाळी आली आहे. प्रदूषणाचे भूत जनतेच्या मानगुटीवर बसले आहे. यामुळे मानसाला स्वच्छ प्राण वायुचा श्वास घेणेही दुर्लभ झाले आहे. ध्वनी प्रदूषणाने कानठल्या बसत आहे. या दोन्ही तालुक्यात सुशिक्षित बेरोजगारांची संख्येत दिवसागणीक वाढ होत आहे. (वार्ताहर)