शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

बौद्धांच्या क्रांतीची सुरुवात चवदार तळ्यापासून - श्याम रामटेके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2016 01:34 IST

भारतीय बौद्ध महासभा तालुका चिमूर अंतर्गत ग्रामशाखा नेरीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे ...

चिमूर : भारतीय बौद्ध महासभा तालुका चिमूर अंतर्गत ग्रामशाखा नेरीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून महाड क्रांती दिवस कार्यक्रम नेरी येथील दिक्षाभूमीमध्ये झाला.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड.संजीवनी सातारडे होत्या. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागभीडचे श्याम रामटेके तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जयदिप खोब्रागडे, बार्टीच्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे, लोमेश खोब्रागडे, भानुदास पोपटे, प्रल्हाद लाडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात बुद्धवंदनेने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्याम रामटेके यांनी महाराजांचा अर्थात बौद्धांच्या शौर्याचा इतिहास सांगितला. हे लोक लढवय्ये व पराक्रमी होते. इतिहासाच्या खोलवर गेले. या जमातीने नेहमी सन्मानासाठी संघर्ष करुन माणसाचे जिवन प्राप्त केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीची खरी सुरुवात महाडच्या चवदार तळ्याचे पाणी या संग्रामपासून झाली आहे, असे त्यांनी मत व्यक्त केले. समाजाने सावधान राहण्याची गरज आहे.सावधान राखण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी शस्त्र दिले. ते शस्त्र म्हणजे मातृसंस्था, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल व पक्ष नावाची संघटना या चाकोरीतून राहून समाजाने कार्य केले पाहिजे. समता सैनिक दल मजबूत करुन गाव तिथे सैनिक निर्माण झाला पाहिजे. देशात जातीभेद, समाजभेद, भ्रष्टाचार, विषमतावाद, जातीय दंगली निर्माण करण्याचे कार्य जोरात सुरु आहे. त्याला उत्तर म्हणजे सामाजिक एकता हेच आहे. तेव्हा समाजाने डॉ. आंबेडकरांची प्रेरणा घेवून महाडच्या क्रांती दिनाची आठवण ठेवली पाहिजे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. आर. कांबळे यांनी केले. संचालन शिवराम मेश्राम व किर्तीशिल ढवळे यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद लाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विलास राऊत, शालिनी डांगे, मिलिंद जांभूळकर, सरिता जनबंधू, शितल पाटील, सोनल डांगे, सुनिल घोनमोडे, मिलिंद कऱ्हाडे, शिला अंबादे, विद्यानंद इंदोरकर, शालिनी साखरे, संजय नागदेवते, निर्दोष पाटील, नितीन इंदोरकर यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)