शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये बसचा भीषण अपघात; १५ जणांचा मृत्यू, अनेक प्रवासी गंभीर जखमी
2
“२ लाख ७० हजाराचा रेकॉर्ड मोडायचा, बारामती निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती पण…”: पार्थ पवार
3
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
4
Ashok Kharat : "...तर नागदेवता तुझ्या मुलास दंश करेल"; भोंदू अशोक खरातने महिलेला दाखवलेली भीती
5
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
6
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
7
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
9
MSRTC: एसटी आगार, परिसर स्वच्छतेचा करोडोंचा खर्च प्रवाशांच्या माथी
10
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
11
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
12
आयआयटीच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक, राज्यातील शैक्षणिक संस्थांना सावधानीचा इशारा
13
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
14
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
15
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
16
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
17
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
18
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
19
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
20
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

काळजी घ्या, डेंग्यू ताप टाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:01 IST

एडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो.

ठळक मुद्देस्वच्छता पाळा : पावसाळ्यात बळावतो धोका, सतर्क राहण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पावसाळा सुरू झाला की, विविध आजार डोकेवर काढतात. या दिवसात डेंग्यू, मलेरिया आदी आजारांच्या रूग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होते. हा आजार पावसाळा संपत असताना आणखी बळावतो. डेंग्यूची लागण झाली की, मृत्यू ओढवतो, अशी भीती अनेकांना वाटते. मात्र, योग्य काळजी घेतल्यास डेंग्युलाही पळविता येते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी, तसेच सतर्क रहावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.डेंग्यू हा डासामुळे पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू एडीस डासाच्या मादीमुळे पसरतो. डेंग्यूचा ताप महाभयानक असतो. उपचाराअभावी रूग्ण दगावतातही. त्यामुळे वेळीच उपचार घेणे गरजेचे आहे. डेंग्यूमुळे लहान मुले आजारी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. तीव्र ताप, डोकेदुखी, दलटी, अंगदूखी, डोळ्यांच्या खोबणीमध्ये दुखणे, अंगावर लालसर पुरळ, तीव्र पोटदुखी, सतत उलट्या होणे, सुस्त व बेशुध्द होणे तर गंभीर डेंग्यू रूग्णांचा रक्तपेशी कमी झाल्याने होणाऱ्या रक्तस्त्रावामुळे मृत्यूदेखील होतो. पावसाळ्याच्या अखेरीस डेंग्यूचा धोका अधिक बळावत असून नागरिकांनी परिसराच्या स्वच्छतेसोबत घरामध्येही स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे.एडीस डासाची वैशिष्ट्येएडीस डास पाच ते सहा मि.मी. लांबीचा असतो. अंगावर पांढरे चट्टे असतात. त्यामुळे याला टायगर मॉस्किटोही म्हणतात. तो दिवसा चावते, वारंवार चावा घेतात. त्यामुळे आजाराची शक्यता वाढते. ४०० मीटरपर्यंत उडू शकते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात या आजाराची लागण होण्याची शक्यता असते. हा डास लोंबकळणाऱ्या वस्तू जसे दोरी लाईटची वायर, छत्री, काळे कपडे आदी ठिकाणी विश्रांती घेतो. या डासांची अंडी वर्षभर पाण्याशिवाय राहू शकतात आणि वर्षभरानंतर पाणी उपलब्ध होताच त्यापासून पुन्हा अळी तयार होते. त्यामुळे डास असलेली भांडी धुवून, पुसून स्वच्छ ठेवावी, जेणेकरून त्यांची पृष्ठभागाला चिकटलली अंडी नष्ट होतील.भरपूर पाणी प्यावे तज्ज्ञांचा सल्ला घ्यावाआजाराची लागण झालेल्या रूग्णांनी भरपूर पाणी प्यावे, पुरेशी विश्रांती घ्यावी, लक्षणानुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घ्यावेत. उन्हाळ्याच्या तुलनेत पावसाळ्यात डेंग्यूचा अधिक प्रसार होण्याचा धोका असतो. त्यामुळे पाणी साचणाºया परिसरात नियमित स्वच्छता करावी. घरातील पिण्याच्या पाण्याची भांडी कोरडी करून पाणी भरावे. घराशेजारी सांडपाणी साचू न देता ते वाहते करावे यामुळे डेग्यू आजार होण्यापासून टाळता येईल.आजार टाळण्यासाठी प्रथम स्वच्छता महत्त्वाची आहे. घराभोवती, इमारतीच्या गच्चीवर पाणी साचू देवू नये, घरातील पाणी साठवणीची भांडी आठवड्यातून किमान एकदा कोरडी करावी. पाण्याचे साठे घट्ट झाकणाने झाकून ठेवावेत. तपासणीसाठी घरी येणाºया आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.- डॉ. ए. एन. कुकडपवार, जिल्हा हिवताप अधिकारी, चंद्रपूरअशी रोखाडासांची उत्पत्तीघराभोवती, परिसरात ज्यामध्ये पाणी साचू शकेल अशा निरूपयोगी वस्तू साठवू नये. खराब टायर्स नष्ट करावेत, पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवावे, घरातील टाक्यांना झाकणे बसवावी, शौचालयाच्या व्हेंटपाईपला जाळी बसवाव, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा, परिसरातील डबकी वाहती करावी, मोठ्या उबक्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावे, साचलेल्या पाण्यात कू्रड आईल किंवा रॉकेल टाळावे, शेणखताचे ढिगारे गावापासून दुर अंतरावर न्यावे यामुळे आजार टाळता येईल.

टॅग्स :dengueडेंग्यू