शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूर पेपर मिलशी श्रीगणेशाचे असे सख्य !

By admin | Updated: September 11, 2016 00:45 IST

संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे.

संकट दूर होण्याची आशा : कामगारांच्या कुटुंबीयांची बाप्पाला प्रार्थनाबल्लारपूर : संकट मोचन अशी श्री गणेशाची कीर्ती आहे आणि गणेशाचे बल्लारपूर पेपर मिल सोबत चांगले जुने सख्य आहे. त्यामुळे या घडीला पेपर मिलवर भिरभिणारे संकट गणपती बाप्पाने दूर करावे, पेपर मिल पूर्ववत सुरू होवून परत त्याला पूर्वीसारखे भरभराटीचे दिवस येवो, अशी प्रार्थना या गणेशोत्सवात गणेश भक्त कामगार व त्यांचे आश्रित त्यांचे कुटुंबियांनी करणे अगदी स्वाभाविक आहे. आणि तशी प्रार्थना केली जात आहे.बल्लारपूर पेपर मिलशी श्री गणेशाचे हे मिल सुरू झाले, तेव्हापासूनचे सख्य आहे, जवळीक आहे. या मिलमध्ये बनलेल्या पहिल्या कागदावर श्री गरेशाचे चित्र असलेले वॉटर मार्क उमटले होते. या वॉटर मार्कचा कागद बरेच दिवसपर्यंत निघत राहिला. बाजारात मोठ्या प्रमाणात खपू लागला होता. श्री गणेशाचे हेच चित्र या मिलच्या पहिल्या एक नंबर मशीनच्या इमारतीच्या दर्शनी भागावरील भिंतीवर मूर्तीरूपाने स्थापित करण्यात आले. ही मूर्ती नागपूरच्या मूर्तीकाराने घडविली आहे. मिल प्रारंभ झाला, त्याच्या पहिल्या गणेशोत्सव ते आजपर्यंत प्रत्येक गणेश चतुर्थीला या मूर्तीला नव्याने रंगवून त्याची महाव्यवस्थापकाचे हस्ते पूजा केली जाते. विद्युत रोषणाईने हा भाग उजळविला जातो. यावर्षीही संकट असले तरी गणेश मदतीला धावणार, अशी आशा आहे.पेपर मिल कॉलनीत व्यवस्थापनाकडून कलामंदिर जवळ गणेशोत्सवात मुर्ती बसविली जाते. हा क्रम गेले ६० वर्षांपासून सुरू आहे. त्याचप्रमाणे पेपर मिलच्या थापर गेट समोरील मेरी पार्क येथे गणेश मंदिर बनवून त्यात श्री गणेशाची संगमेवरवरची भव्य मूर्ती बसविली आहे. तद्वतच, जंगलात मिळालेल्या गणेशाच्या दोन सारख्या आकाराच्या दगडी मूर्तीही याच परिसरात छोटे मंदिर बनवून त्यात बसविल्या आहेत. श्री गणेशाचे पेपर मिलमध्ये असे अनन्य साधारण महत्त्व आहे. आणि म्हणूनच पेपर मिलवर सध्या आले असलेले संकट दूर होईलच. शिवाय पूर्वीसारखी संपन्नता नांदेल, असा आशावाद विश्वास कामगारांच्या अधिकाऱ्यांच्या मनी आहे. (तालुका प्रतिनिधी)