शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

भरपाई देण्यास वेकोलिची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2016 00:39 IST

वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा ...

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना : नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेतसास्ती : वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोवनी खुल्या कोळसा खाणीकरीता गोवरी शेतशिवारातील चिंचोली नाल्यांचा प्रवाह बदलविल्यामुळे व नाल्याच्या काठावर मातीचे महाकाय ढिगारे उभे केल्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होते. परिसरातील शेकडो एकरातील शेती पाण्याखाली येऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वेकोलिने नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र वेकोलिने नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाची अवहेलना केली आहे.राजुरा तालुक्यातील सास्ती-गोवरी-पोवनी परिसरात मोठ्या प्रमाणात वेकोलिच्या कोळसा खाणी आहेत. नव्यानेच पोवनी-२ व पोवनी-३ अशा दोन कोळसा खाणीही सुरू झाल्या आहेत. वेकोलि कोळसा उत्पादनासाठी वाटेल तशा पद्धतीने प्रयत्न करीत असून नियमबाह्य व धोकादायक कामे करीत आहे. त्यात शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या जीवाचाही विचार केला जात नाही.वेकोलि कोळसा खाणीकरीता परिसरात असलेल्या नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह सुद्धा बदलविला आहे. नाल्याच्या काठावरच उत्खनन केलेले मातीचे महाकाय ढिगारे उभे केले आहे. त्यामुळे अल्पशा पावसामुळे सुद्धा कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून गोवरी- पोवनी परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो एकर शेती पाण्याखाली जाऊन मोठे नुकसान होते. तर गोवरी गावात सुद्धा पाणी शिरून मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागतो. परंतु वेकोलि याकडे कमालीचे दुर्लक्ष करीत असून त्यावर कोणतीही उपाययोजना करीत नसल्याचे दिसून येत आहे.यावर्षीच्या हंगामात जून २०१५ ला कृत्रिम पूरस्थिती निर्माण होऊन परिसरातील दोनशे एकरातील लागवड केलेले पीक नष्ट झाले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई मिळावी म्हणून वेकोलि व शासनाकडे मागणी केली होती. त्यानुसार उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी परिसराचे सर्व्हेक्षण करुन शेतीचे नुकसान झालेल्या २९ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश नोव्हेंबर २०१५ ला वेकोलिला दिले होते. परंतु आजपर्यंत त्या शेतकऱ्यांना सदर नुकसान भरपाई मिळाली नसून शेतकरी नुकसान भरपाईच्या आशा बाळगून आहेत. २० जानेवारीला केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुद्धा नुकसान भरपाई द्यावी असे पत्र वेकोलिला दिले आहे. परंतु वेकोलिने याकडे दुर्लक्षच केले आहे. (वार्ताहर)नियमांचे होत नाही पालनवेकोलिने कोळसा खाणीकरीता परिसरातील जिवंत नाल्यांचा प्रवाह बदलविला. सदर प्रवाह बदलविण्यासाठी रितसर शासनाची मंजूरी घेतली असली तरी परवानगी देताना जलसंधारण विभागाने घातलेल्या अटींचे पालन होत नसल्याचे दिसून येत आहे. वळविलेल्या नाल्याची दरवर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ काढणे, रुंदी व खोली नियमानुसार ठेवणे अशा विविध अटी आहेत. परंतु वेकोलि प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे परिसरात कृत्रिम पूरस्थिती निर्माण होत असून शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.वेकोलिने वळविलेल्या नाल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे. वेळोवेळी वेकोलि प्रशासन व शासनाकडे नुकसान भरपाई मागणी केल्या गेली. परंतु याकडे दुर्लक्षच होत गेले. यावेळी मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांनी वेकोलिला आदेश देऊनही नुकसान भरपाई मिळाली नसल्याने वेकोलिची बळबजरी उघड झाली आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरीत नुकसान भरपाई देण्यात यावी.- रुपेश पाचभाई,शेतकरी गोवरी