शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे तब्बल २०० एकर जमीन पडीक; जागेचा सदुपयोय केव्हा? बेरोजगारांचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:39 IST

Chandrapur : सदुपयोग व्हावा इंग्रजांनी आरक्षित करून ठेवली होती जमीन

घनश्याम नवघडे लोकमत न्यूज नेटवर्क नागभीड: नागभीड येथे रेल्वेच्या मालकीची २०० एकर जमीन आहे. ही जमीन वापराविना अशीच पडून आहे. या जागेचा सदुपयोग केव्हा होईल असा येथील बेरोजगारांचा प्रश्न आहे. 

नागभीड येथून १९०८ साली रेल्वेची सुरुवात झाली. काही दिवसांतच जंक्शनही निर्माण झाले. नागभीडचे मध्यवर्ती स्थान लक्षात घेऊन इंग्रजांनी रेल्वे स्थानकाच्या सभोवताली २०० एकर जमीन खरेदी केली. बिलासपूर झोनमध्ये नैनपूरनंतर नागभीड येथेच रेल्वेकडे एवढी जमीन असल्याची माहिती आहे. 

इंग्रजांनी नागभीड येथे २०० एकरच्या जवळपास जमीन राखीव करून ठेवली, याच्या मागे त्यांचा काही तरी उद्देश नक्कीच असेल. रेल्वेसंबंधी एखादा कारखाना नागभीड येथे सुरू करण्याचा त्यांचा मानस निश्चित असावा. कारण नागभीड येथे तिन्ही मार्गाना रेल्वेचे जाळे असल्याने नागभीड येथून चंद्रपूर, बल्लारपूर मार्गे दक्षिणेकडे, नागपूरमार्गे उत्तरेकडे, गोंदियामार्गे पूर्वेकडे उत्पादित मालाची वाहतूक सहज शक्य होती. मात्र, इंग्रज जाऊन आता ७५ वर्षाच्या वर कालावधी लोटत आहे, पण या जागेचा कोणताच उपयोग होताना दिसत नाही. म्हणूनच या भागात आजही विनोदाने म्हटले जाते की, इंग्रज आणखी १० ते २० वर्षे या देशात राहायला पाहिजे होते, त्यांनी या जागेवर एखादा प्रकल्प निश्चितच उभारला असता आणि या भागातील बेरोजगारांना निश्चितच रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असत्या. 

सदनिका उभारणार? 

  • इंग्रज गेले, पण इंग्रजांनी या ठिकाणी एवढी जमीन का आणि कशासाठी खरेदी करून ठेवली, याचा अभ्यास करण्यासाठी कोणीही तसदी घेतली नाही. या रेल्वे गाडीचा थांबा द्या, त्या रेल्वे गाडीचा थांबा द्या या मागणी पलीकडे कुणीही जात नाही हेच या भागाचे मोठे दुर्दैव आहे. आता तर रेल्वेच्या या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सदनिका उभ्या करण्याचे काम रेल्वे विभागाने सुरू केले आहे. 
  • भविष्यात नागपूर येथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी नागभीड येथे सदनिका उभारण्याचे नियोजन असल्याची चर्चा रेल्वे वर्तुळात आहे.

"जागेची उपलब्धता लक्षात घेऊन येथे रेल्वेसंबंधी विविध प्रकल्पांना वाव आहे. पूर्वी येथे इंजिन दुरुस्ती केंद्र होते. ते बंद करण्यात आले. हे केंद्र पुन्हा सुरू करावे, रेल्वे डब्यांचा कारखाना होऊ शकतो. अशा अनेक प्रकल्पांना वाव आहे. ज्यातून बेरोजगारांना काम मिळेल." - गुलजार धम्माणी, अध्यक्ष व्यापारी संघ नागभीड

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरrailwayरेल्वे