शहरं
Join us  
Trending Stories
1
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
2
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
3
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
4
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
5
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
6
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
7
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
8
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
9
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
10
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
11
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
12
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
13
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
14
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
15
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
16
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
17
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
18
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
19
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
20
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणाऱ्या गुरुजींना चाप

By admin | Updated: January 10, 2016 00:59 IST

शाळेची प्रार्थना आटोपल्यानंतर मुलं वर्गात जातात. गुरुजी वर्गात आल्याबरोबर ‘एक साथ नमस्ते’ गुडमार्निंग या शब्दांनी एका सुरात विद्यार्थी गुरुजींना अभिवादन करतात.

नोकरी येऊ शकते धोक्यात : शासनाचे सर्व लाभ होणार बंदतळोधी (बा) : शाळेची प्रार्थना आटोपल्यानंतर मुलं वर्गात जातात. गुरुजी वर्गात आल्याबरोबर ‘एक साथ नमस्ते’ गुडमार्निंग या शब्दांनी एका सुरात विद्यार्थी गुरुजींना अभिवादन करतात. मात्र गुरुजी वर्गात येण्यापूर्वीच तोंडात खर्ऱ्याचा बोचका भरून असल्यामुळे विद्यार्थ्यांना हातवारे खाली बसण्याचा इशारा करतात आणि तोंडातील खर्रा खाऊन तोंडात झालेला पचका खिडकीतून बाहेर किंवा वर्गखोलीच्या एका कोपऱ्यात उडवून हजेरी घ्यायला सुरूवात करतात. असे चित्र दररोजच शहरी तसेच ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये रोजच पहायला मिळत. पण यापुढे गुरुजींना आपली तलफ आवरावी लागेल नाही तर त्यांच्या नोकरीवर गदा येवू शकते.शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी रोजी यासंदर्भात पत्र निर्गमित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील संपुर्ण शाळेतील शिक्षकांना तंबाखू, खर्रा, बिडी, सिगारेट व दारूचे व्यसन करीत असलेल्यांना बंदी घालण्याबाबतचे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकानुसार शाळेत विद्यार्थ्यांना शिकवताना खर्रा, तंबाखू व दारू तसेच पानाचे सेवन करून काही शिक्षक शिकवित असल्याचे निदर्शनास आले असुन त्याचा परिणाम विद्यार्थ्यावर होत आहे. त्यातून विद्यार्थीसुद्धा हळूहळू व्यसनाच्या अधिन होत आहे. ग्रामीण भागात अशा शिक्षकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे असेही त्यात नमुद केले आहे.अशा प्रकारचे व्यसन करणाऱ्या शिक्षकांबद्दल कठोर निर्णय घेवून त्यांची बढती न करणे, पुरस्कार न देणे, त्यांना मिळणाऱ्या शासनाच्या सोयी-सुविधांपासून वंचीत करणे व जे शिक्षक सांगुनही याचे पालन करीत नाही, त्यांना बडतर्फ करावे असे नमुद केले आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाला जि.प. शाळा व खासगी संस्थाच्या शाळांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहे.‘ओरीएंट ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरम’ या ठाण्याच्या स्वयंसेवी संस्थेने शिक्षण संचालकाकडे यासंबंधी तक्रार केली होती. शिक्षकच जर तंबाखू, गुटखा, खर्रा खाऊन अध्यापन करीत असेल तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होऊन तेदेखील व्यसनाच्या अधिन जातात. (वार्ताहर)व्यसनाला जवळ करणाऱ्या गुरूजींनो सावधान...शिक्षण संचालनालयाकडून व्यसनी शिक्षकांविरूद्ध कारवाई करण्याच्या सुचना शिक्षण उपसंचालकांना प्राप्त झाल्या असुन त्यानुसार प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षकांवर लक्ष ठेवण्याचे सुचित करण्यात आले आहे.या परिपत्रकामुळे व्यसनी गुरुजींच्या तंबूत विविध चचउधान आले आहे.या परिपत्रकासंबंधीचा मेसेज मागील दोन दिवसापासून व्हॉट्सअ‍ॅप वर फिरत आहे.शाळेत असताना तंबाखू, खर्रा, पान न खाण्याचा संकल्प काही शिक्षकांनी केला तरी शाळेच्या बाहेर व्यसन करण्यावर ते ठाम आहे.