शेतकऱ्यांना विविध कृषी योजना मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST2021-04-13T04:26:32+5:302021-04-13T04:26:32+5:30

यासाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांची भेट घेऊन सदर ...

Approved various agricultural schemes to farmers | शेतकऱ्यांना विविध कृषी योजना मंजूर

शेतकऱ्यांना विविध कृषी योजना मंजूर

यासाठी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांची भेट घेऊन सदर योजना लवकरात लवकर मंजूर करण्यात याव्या, अशी मागणी केली होती.

कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या अनेक योजनांसाठी अर्ज सादर केले होते. काटेरी तार, स्प्रेपंप, ताडपत्री, कॅरेट इत्यादी योजनांसाठी अर्ज सादर केले होते. यातील सर्व उपकरणे शेती उपयोगी येणार आहेत, तसेच या योजना मंजूर झाल्या नसल्यामुळे शेतकरी सदर लाभाच्या प्रतीक्षेत होते, त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे यांनी कोरपना तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर केलेले आहेत. तालुक्यातील लाभार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती उरकुडे यांचे आभार व्यक्त केले आहे.

तसेच कोरपना तालुक्यातील लाभार्थ्यांनी पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क साधून मंजूर झालेल्या योजनांना लाभ घ्यावा, असे आवाहन भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष ताजने यांनी केले आहे.

Web Title: Approved various agricultural schemes to farmers