शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाकडून अखेर बाह्य परीक्षकाची नियुक्ती

By admin | Updated: April 23, 2015 01:12 IST

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे.

वरोरा : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू आहे. विद्यापीठाने बाह्य परीक्षकाची नियुक्ती करूनही ेबाह्य परीक्षक आलेच नाही. त्यामुळे चक्क सहा दिवस बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच एकच खळबळ उडाली. अखेर वृत्ताची दखल घेऊन बुधवारीच बाह्य परीक्षकांची तातडीने नियुक्ती करण्यात आली. या केंद्रावर आता बाह्य परीक्षा रुजू झाले आहेत.गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने वरोरा शहरातील लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर १३ एप्रिलपासून परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षा केंद्रावर परीक्षा प्रमुख म्हणून महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकाची नियुक्ती व त्यासोबत बाहेरील महाविद्यालयातील प्राध्यापकाची बाह्य परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते. गोंडवाना विद्यापीठाने बाह्य परीक्षक म्हणून नेमणूक केलेली व्यक्ती परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून गैरहज होती. ही बाब नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्ती व परीक्षा प्रमुखांनी विद्यापीठास तातडीने कळविली देखील. तरीही कसलीही दखल झाली नाही. अशा अवस्थत मागील सहा दिवसापासून लोकमान्य महाविद्यालयाच्या केंद्रावर बाह्य परीक्षकाविना परीक्षा सुरू होती. सहा दिवस होवूनही लोकमान्य महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर बाह्य परिक्षक नाही, असे वृत्त १९ एप्रिल रोजीच्या अंकात प्रकाशित होताच विद्यापीठाने प्रशासनात खळबळ उडाली. अखेर २० एप्रिल रोजी सोमवारला बाह्य परीक्षकाची नियुक्ती करुन विद्यापीठाने अखेरीस उशिरा का होईना पण, झालेला गोंधळ सावरण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत यावर पडदा टाकला आहे. (तालुका प्रतिनिधी)