शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
5
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
6
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
7
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
8
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
9
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
10
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
11
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
12
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
13
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
14
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
15
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
16
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
17
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
18
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
19
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
20
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता.

ठळक मुद्देबिनबा गेट परिसर सील : चंद्रपुरात १७ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपुरात बुधवारी दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. महानगर प्रशासनाने ९ मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या २३ वर्षीय मुलीला होम क्वारन्टाईन केले होते. ११ मे रोजी या मुलीचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तत्काळ आरोग्य पथक सदर मुलगी राहत असलेल्या बिनगा गेट परिसरात दाखल झाले. पुढील १४ दिवसांसाठी बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे.जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वत: बिनबा गेट परिसरात जाऊन पाहणी केली. दरम्यान यापुढे रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिटयूशनल क्वारन्टाइन) करण्यात यावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता. २ मे रोजी रात्रपाळी काम करणारा एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आढळला. मात्र त्याच्या कुटुंबातील कोणीही पॉझिटिव्ह नाही. तो राहत असलेला कृष्णनगर परिसर व सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. बुधवारी पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. यापुढे नागरिक रेडझोन व जोखमीच्या जिल्ह्यातून परतल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.१३ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १७ मे रोजीपर्यंत संपूर्ण चंद्रपूर शहरात ४ मेपूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १४ मेपासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी राहणार आहेत.संपर्कातील नागरिकांची सूची तयार करणारसंबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्यात येणार आहे. पोलीस विभागाने तत्काळ या परिसरात नाकाबंदी करावी, असे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या