दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढली चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 05:01 IST2020-05-14T05:00:00+5:302020-05-14T05:01:36+5:30

चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता.

Anxiety increased due to the second positive patient | दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढली चिंता

दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढली चिंता

ठळक मुद्देबिनबा गेट परिसर सील : चंद्रपुरात १७ मेपर्यंत पुन्हा लॉकडाऊन पूर्ववत

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपुरात बुधवारी दुसरा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. महानगर प्रशासनाने ९ मे रोजी यवतमाळ येथून आलेल्या २३ वर्षीय मुलीला होम क्वारन्टाईन केले होते. ११ मे रोजी या मुलीचे स्वॅब घेण्यात आले. त्याचा अहवाल बुधवारी पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तत्काळ आरोग्य पथक सदर मुलगी राहत असलेल्या बिनगा गेट परिसरात दाखल झाले. पुढील १४ दिवसांसाठी बिनबा गेट परिसर सील करण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी स्वत: बिनबा गेट परिसरात जाऊन पाहणी केली. दरम्यान यापुढे रेडझोनमधून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिटयूशनल क्वारन्टाइन) करण्यात यावेत, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यातील दुसरा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर एक व्हिडिओ संदेश विजय वडेट्टीवार यांनी जारी केला. यामध्ये त्यांनी जिल्हावासीयांना कोरोना आजाराला सहज न घेण्याचे आवाहन केले. अन्य राज्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना जिल्ह्यात परत घेताना त्यांना आता संस्थात्मक अलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारन्टाईन ) करण्याचे निर्देश दिले. आत्तापर्यंत जिल्हा हा कोरोनामुक्त होता. २ मे रोजी रात्रपाळी काम करणारा एक सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह आढळला. मात्र त्याच्या कुटुंबातील कोणीही पॉझिटिव्ह नाही. तो राहत असलेला कृष्णनगर परिसर व सुरक्षारक्षक म्हणून काम करत असलेल्या अपार्टमेंटमध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नाही. सगळ्यांचे नमुने निगेटिव्ह निघाले आहेत. बुधवारी पुन्हा एक रुग्ण पॉझिटिव्ह निघाला. यापुढे नागरिक रेडझोन व जोखमीच्या जिल्ह्यातून परतल्यानंतर त्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
१३ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १७ मे रोजीपर्यंत संपूर्ण चंद्रपूर शहरात ४ मेपूर्वी असणारे लॉकडाऊन कायम राहील, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे १४ मेपासून शहरांमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत उघडी राहणार आहेत.

संपर्कातील नागरिकांची सूची तयार करणार
संबंधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची सूची तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर या परिसरातील संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब तपासणी करणे, परिसराची संपूर्ण नाकाबंदी करणे, आरोग्य पथक प्रत्येक घराच्या तपासणीसाठी गठित करण्यात येणार आहे. पोलीस विभागाने तत्काळ या परिसरात नाकाबंदी करावी, असे निर्देशही ना. वडेट्टीवार यांनी दिले.

Web Title: Anxiety increased due to the second positive patient