तळोधी येथे स्टेट बँक ही एकमेव राष्ट्रीय बँकेची शाखा आहे. शेतकरी, शेतमजूर व विविध गावातील अधिक खातेदारांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. सकाळीच नंबर लागावा, यासाठी शेतकरी, शेतमजूर व अन्य खातेदार बँकेत आर्थिक व्यवहार व देवाण-घेवाण करण्याकरता येतात. मात्र लिंग फेल होत असल्याने आर्थिक देवाणघेवाण थांबतात. काहींना रिकाम्या हाताने गावाला परत जावे लागत आहे. हा असा प्रकार काही दिवसापासून सुरू आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}निवडणुकीसाठीबँक खाते पुस्तिकेची गरज
राज्य शासनाने ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली. निवडणुकीसाठी बँक खाते पुस्तिकेची गरज आहे. त्यामुळे खातेदारांची संख्या वाढली आहे.अशा परिस्थितीत लिंक फेलचा ग्राहकांना फटका बसत आहे.