शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आनंदवन एक्स्प्रेसचे चंद्रपुरात जंगी स्वागत

By admin | Updated: January 14, 2016 01:45 IST

कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाची महती साता समुद्रापलीकडे आहे. या आनंदवनच्या नावाने मुंबई-काझीपेठ

वरोरा व चंद्रपुरात कार्यक्रम : मुंबई-काझीपेठ अशी साप्ताहिक गाडीवरोरा : कर्मयोगी बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाची महती साता समुद्रापलीकडे आहे. या आनंदवनच्या नावाने मुंबई-काझीपेठ एक्स्प्रेस ११ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. आनंदवन एक्स्प्रेसच्या प्रथम आगमनानिमीत्त्य वरोरा रेल्वे स्थानकावर १२ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास जंगी स्वागत करण्यात आले. या एक्सप्रेसचे चंद्रपुरातही जंगी स्वागत झाले.मुंबई येथील छत्रपती शिवाजी टर्मिनल्स् येथे आनंदवन एक्स्प्रेसला ११ जानेवारीला सकाळी ११ वाजता नवी दिल्ली येथील रेल्वे भवन येथून व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर आनंदवन एक्स्प्रेस काझीपेठच्या दिशेने रवाना झाली. वरोरा रेल्वेस्थानकावर आनंदवन एक्स्प्रेसचे १२ जानेवारी रोजी मंगळवारला पहाटे ५ वाजताच्या सुमारास आगमन झाले. त्यावेळी वरोरा रेल्वेस्थानकावर केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आनंदवन एक्स्प्रेसचे चालक, गार्ड आदी कर्मचाऱ्यांना शाल व श्रीफळ देवून सत्कार केला. यावेळी महारोगी सेवा समिती आनंदवनचे सचिव डॉ. विकास आमटे, माजी पालकमंत्री संजय देवतळे, आनंदवन ग्रामपंचायतचे उपसरपंच सुधाकर कडू, रेल्वे अधिकारी एस. के. दास, व्यवसायिक निरीक्षक उमेश शर्मा, भाजपा तालुका अध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा भागडे, भाजपा तालुका संघटक ओमप्रकाश मांडवकर, विजय राऊत, नरेंद्र जिवतोडे, डॉ. सागर वझे, अरुण आखतकर, सुनील जवदंड यांच्यासह वरोरा शहरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)