शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

फोडणीसोबतच देवापुढचा दिवाही महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2021 5:00 AM

अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. अशा कठीण प्रसंगी महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. रोजच्या गरजेचे असलेले फोडणीचे तेलही वर्षभरात ३० ते ५० रुपयांपर्यंत महाग झाले आहे, तर मागील काही दिवसांत तेलाच्या किमती १० रुपयांनी पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे फोडणीसह देवापुढील दिवाही महागला आहे.

ठळक मुद्देसोयाबीन आणि पामतेलाचे दर १० रुपयांनी वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांत महागाई सातत्याने वाढत आहे. यातून फोडणीचे तेलही सुटले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना फोडणीसोबत देवापुढे दिवाही ठेवणे कठीण होऊन बसले आहे. कोरोना संकटामुळे सामान्य नागरिक आर्थिक संकटात सापडला आहे. सातत्याने वाढणाऱ्या महागाईमुळे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे. अनेकांच्या हातचा रोजगारही गेला आहे. अशा कठीण प्रसंगी महागाई दररोज उच्चांक गाठत आहे. रोजच्या गरजेचे असलेले फोडणीचे तेलही वर्षभरात ३० ते ५० रुपयांपर्यंत महाग झाले आहे, तर मागील काही दिवसांत तेलाच्या किमती १० रुपयांनी पुन्हा वाढल्या आहेत. त्यामुळे फोडणीसह देवापुढील दिवाही महागला आहे.

कारण काय?मागील काही दिवसांपासून इंधनाचे दर झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे वाहतूक खर्च अतिरिक्त करावा लागत आहे. त्यातच सोयाबीन, तसेच तेल उत्पन्न मिळणारे इतर शेतमालांचे उत्पादन काही अंशी कमी झाल्यामुळे सध्या तेलाचे भाव गगनाला भिडले आहे. विशेषत: सध्या सणावारांचे दिवस आहे. या दिवसांमुळे बहुतांश तेल उत्पादक कंपन्या नफ्यासाठी तेलाचे भाव वाढवितात.  परिणामी, सामान्य, तसेच गरीब नागरिकांच्या खिशाला आर्थिक ताण पडत आहे.

पोटपूजेसोबतच देवपूजाही महागली

कोरोना संकटामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आला आहे. त्यातच वाढत्या महागाईमुळे जगणे कठीण होऊन बसले आहे. इंधन दरवाढ झाल्यामुळे प्रत्येक    गोष्टी महागल्या आहेत. तेलाचे दरही      वाढले आहे. त्यामुळे महागाई कमी करून दिलासा देणे गरजेचे        आहे.- शांताबाई महाजन, चंद्रपूर

तेलाचे भाव सातत्याने वाढत आहे. ८० ते ९० रुपये लीटर असलेले तेल आता १४० ते १५० रुपयांवर गेले आहे.  सरकार गोरगरिबांचा विचारच करीत नाही. निवडणूक आल्या की, केवळ आश्वासन देऊन मोकळे होतात. आता महागाई वाढली असतानाही कोणीच बोलायला तयार नाही.- लता मैंदळकर, चंद्रपूर

 

टॅग्स :Oil refineryतेल शुद्धिकरण प्रकल्प