शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

राखी कंचर्लावारसह तिघांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:01 IST

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन दाखल झाले आहे.

ठळक मुद्देमहापौर पद निवडणूक : उपमहापौर पदासाठी सहा नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन दाखल झाले आहे.महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव आहे. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली आहे. ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्ट्रवादी -२, शिवसेना - २, मनसे - २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आॅक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. आता २२ नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत महापौर पदासाठी उमेदवारी निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ऐनवेळी फुटाफुटीचे राजकारण होऊ नये, म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना पेंच येथे सहलीला पाठविले. रविवारी दुपारीच सर्व ३७ नगरसेवक पेंचसाठी रवाना झाले. हे नगरसेवक २२ नोव्हेंबरलाच परत येणार आहे.यांनी भरले नामांकनदरम्यान, सोमवार महापौर व उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस होता. या दिवशी महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांना नामांकन दाखल केले आहे. यात भाजपकडून विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे, शहर विकास आघाडीकडून दीपक जयस्वाल, बसपा आघाडीकडून अनिल रामटेके, काँग्रेसकडून अशोक नागापुरे, प्रशांत दानव व मनसेकडून सचिन भोयर यांनी आपले नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. दरम्यान ज्यांना आपले नामांकन परत घ्यायचे असेल ते २२ नोव्हेंबर नामांकन परत घेऊ शकतात.विरोधी पक्षाकडून फोडाफोडीचा प्रयत्नचंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ३७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच महापौर बसेल, असे जवळजवळ निश्चित दिसत आहे. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार महापौर पदासाठी उभे केले आहे. फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जाण्याची शक्यता आहे. जादुई आकडा जुळविण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान सोमवारी रात्री काँग्रेस व सर्व आघाड्यांची या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचीही माहिती आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक