राखी कंचर्लावारसह तिघांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 05:00 AM2019-11-19T05:00:00+5:302019-11-19T05:01:07+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन दाखल झाले आहे.

All three nominations were filed with Rakhi Kancharlawar | राखी कंचर्लावारसह तिघांचे नामांकन दाखल

राखी कंचर्लावारसह तिघांचे नामांकन दाखल

googlenewsNext
ठळक मुद्देमहापौर पद निवडणूक : उपमहापौर पदासाठी सहा नामांकन

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होत आहे. या निवडणुकीची चुरस आता चांगलीच वाढली आहे. मनपा वर्तुळातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी महापौर पदासाठी तीन जणांनी आपले नामांकन दाखल केले तर उपमहापौर पदासाठी एकूण सहा नामांकन दाखल झाले आहे.
महापौर पद यावेळी महिलेसाठी (खुला प्रवर्ग) राखीव आहे. महापौर पदाच्या खूर्चीवर विराजमान होण्यासाठी इच्छुक नगरसेविकांनी आपली धडपड वाढविली आहे. ६६ सदस्यांच्या चंद्रपूर महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत म्हणजे ३७ नगरसेवक आहेत. त्यापाठोपाठ कॉंग्रेसकडे १३, बसपा - ६, राष्ट्रवादी -२, शिवसेना - २, मनसे - २, तर चार नगरसेवक अपक्ष आहेत. विद्यमान महापौर अंजली घोटेकर यांचा कार्यकाळ ३० आॅक्टोबरला संपला. मात्र विधानसभा निवडणुकीमुळे त्यांना २१ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली. आता २२ नोव्हेंबरला महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होत आहे. चंद्रपूर महापालिका २०१२ ला अस्तित्वात आल्यापासून तीन महापौर बसले. हे तीनही महापौर महिलाच होत्या आणि आता चवथ्यांदाही महिलाच महापौर राहणार आहे. त्यामुळे पक्षांतर्गत महापौर पदासाठी उमेदवारी निश्चित झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, मनपा वर्तुळातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच ऐनवेळी फुटाफुटीचे राजकारण होऊ नये, म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना पेंच येथे सहलीला पाठविले. रविवारी दुपारीच सर्व ३७ नगरसेवक पेंचसाठी रवाना झाले. हे नगरसेवक २२ नोव्हेंबरलाच परत येणार आहे.

यांनी भरले नामांकन
दरम्यान, सोमवार महापौर व उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल करण्याचा दिवस होता. या दिवशी महापौर पदासाठी भाजपकडून राखी कंचर्लावार तर काँग्रेसकडून सुनिता लोढिया व कल्पना लहामगे यांनी नामांकन दाखल केले. उपमहापौर पदासाठी एकूण सहा जणांना नामांकन दाखल केले आहे. यात भाजपकडून विद्यमान स्थायी समिती सभापती राहुल पावडे, शहर विकास आघाडीकडून दीपक जयस्वाल, बसपा आघाडीकडून अनिल रामटेके, काँग्रेसकडून अशोक नागापुरे, प्रशांत दानव व मनसेकडून सचिन भोयर यांनी आपले नामांकन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केले आहे. दरम्यान ज्यांना आपले नामांकन परत घ्यायचे असेल ते २२ नोव्हेंबर नामांकन परत घेऊ शकतात.

विरोधी पक्षाकडून फोडाफोडीचा प्रयत्न
चंद्रपूर महानगरपालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. ३७ नगरसेवक भाजपचे आहेत. त्यामुळे महापौर पदावर भाजपचाच महापौर बसेल, असे जवळजवळ निश्चित दिसत आहे. तरीही काँग्रेसने आपले उमेदवार महापौर पदासाठी उभे केले आहे. फोडाफोडीचे राजकारण त्यांच्याकडून खेळले जाण्याची शक्यता आहे. जादुई आकडा जुळविण्यासाठी काँग्रेसकडूनही प्रयत्न केला जात आहे. दरम्यान सोमवारी रात्री काँग्रेस व सर्व आघाड्यांची या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार असल्याचीही माहिती आहे.

Web Title: All three nominations were filed with Rakhi Kancharlawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.