शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
3
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
4
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
5
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
6
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
7
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
8
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
9
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
10
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
11
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
12
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
13
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
14
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
15
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
16
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
17
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
18
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
19
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
20
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

भद्रावतीमधील आठ गावांना हवा वरोरा तालुका

By admin | Updated: July 10, 2014 23:31 IST

भद्रावती तालुक्यातील आठ गावांना या तालुक्यातून वगळून वरोरा तालुका कार्यालयाशी जोडण्याची मागणी जोर धरत असून या मागणीच्या समर्थनार्थ भाजपाचे तालुका ग्रामीण सचिव रविंद्र धोटे आणि

कुचना : भद्रावती तालुक्यातील आठ गावांना या तालुक्यातून वगळून वरोरा तालुका कार्यालयाशी जोडण्याची मागणी जोर धरत असून या मागणीच्या समर्थनार्थ भाजपाचे तालुका ग्रामीण सचिव रविंद्र धोटे आणि माजी जि.प. सदस्य सुधीर उपाध्याय हे ग्रामस्थांची मागणी शासन दरबारी रेटणार आहेत. तालुक्यातील कुचना, नागलोन, विसलोन, पळसगाव, पाटाळा, राळेगाव, मनगाव, थोराना ही आठ गावे असून या गावांचे तालुका मुख्यालय अंतर किमान १८ ते २५ किलोमिटर अंतरावर आहे. सरळ पोहोचण्यासाठी साधनांची उपलब्धता नाही. यामुळे शालेय शिक्षणासाठीचे दाखले, तहसीलची विविध कामे, शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांची माहिती व उपयोगितेसाठी पंचायत समिती तथा कृषी विभागाची कार्यालये, तालुका न्यायालय तथा भूमी अभिलेख कार्यालयातील विविध विधी अथवा जमिनीचे खटले यासारख्या अनेक तालुका ठिकाणावरुन होणाऱ्या दैनंदिनी कामासाठी या गावातील नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतो. एवढेच काय, नुकत्याच झालेल्या पदवीधर मतदार संघ निवडणुकीत या शेवटच्या टोकावरुन तालुक्याला मतदानासाठी जाणाऱ्या अनेक पदविधरांची अक्षरश: दमछाक झाली. यात बव्हंशी मतदारांनी आपली पदवी व पदव्यूत्तरांची समजदारी अनावश्यक त्रासापायी मतदान न करण्यातच आटोपली.माजरी येथे सात वर्षांपूर्वी पोलीस ठाणे झाले. या ठाण्याचे वरिष्ठ कार्यालय वरोरा येथे आहे. एवढेच नव्हे तर शवविच्छेदनगृहसुद्धा वरोरा येथे आहे. मात्र गुन्ह्यांची नोंद केल्यानंतर या सर्व बाबी भद्रावती तालुक्याच्या न्यायकक्षेत येत असल्यामुळे नागरिकांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडत आहे.याशिवाय माजरी मार्गे भद्रावतीला जायचे म्हटले तर किमान दोन तास आधी निघावे लागते. कारण मधेच वणी आणि दक्षिण रेल्वे मार्ग असे दोन रेल्वेगेट पडतात आणि हे दोन्ही रेल्वे गेट हमखास किमान अर्धा ते पाऊण तास बंद असतात. त्यामुळे कित्येकांच्या कोर्टाच्या तारखाही चुकून जातात.याशिवाय भद्रावती न्यायालय व तालुका कार्यालय आणि भूमी अभिलेख कार्यालये बसस्थानकापासून दीड ते दोन कि.मी अंतरावर तर पंचायत समिती, कृषी कार्यालये भद्रावती शहरात किमान दोन- तीन कि.मी. अंतरावर यामुळे बस अथवा आॅटोने प्रवास करणाऱ्या ग्रामस्थांना या कार्यालयातील कामे उरकताना संध्याकाळ जाग्यावरच होतो. उल्लेखनीय वरील आठही गावातून सरळ राज्य परिवहन महामंडळाची बससेवा उपलब्ध नाही. यासाठी माजरी मार्ग किंवा वरोरावरुन भद्रावती असेच बसचे मार्ग आहेत. याशिवाय वर्धा नदी किनारी असलेल्या या गाववात पावळ्यात आपत्ती निवारणासाठीही तालुका कार्यालयाची दमछाक होते. या तुलनेत वरोरा हे तालुका मुख्यालय किमान नऊ ते १५ कि.मी. अंतरावर असून ये- जा करण्यासाठी साधनांची उपलब्धता असते. याशिवाय वरोरा तालुक्यातील कार्यालये न्यायालय, पंचायत समिती, कृषी, उपनिबंधक कार्यालय, भूमिअभिलेख आदी सर्व विभाग पायदळ अंतरावर असून नागरिकांना कामे करताना कसलाही शारिरीक त्रास होत नाही. रविंद्र धोटे आणि सुधीर उपाध्याय यांनी ग्रामस्थांची स्वाक्षरी मोहीम सुरू केली असून लवकरच संबंधित ग्रामपंचायतीमधून ग्रामसभेचा ठराव संमत करून हे स्वाक्षरी निवेदन व ठरावाच्या प्रति जिल्हाधिकाऱ्यांसह राज्याच्या मुख्यमंत्र्याना पाठविणार असल्याची माहिती ‘लोकमत’ ला दिली. (वार्ताहर)