शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या सावटात मशागतीचीे कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 05:00 IST

ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे.

ठळक मुद्देशेतकरी चिंतेत : अशीच स्थिती राहिल्यास खरीप हंगामावर होणार परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: कोरोनाचे थैमान सुरु आहे. राज्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ही परिस्थिती पुढे नियंत्रणात आली नाही, तर त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहे. दरम्यान, काही शेतकऱ्यांनी कोरोनाच्या सावटात शेती मशागतीचे कामे सुरू केली आहे.ग्रामीण भागात एकीकडे कृषी संबंधातील सर्व बाबींना लॉकडाऊनमधून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे खते किंवा बियाणे खरेदीची अडचण येणार नाही. परंतु कोरोनाचा उद्रेक वाढतच राहीला, तर शेतकऱ्यांना घराबाहेर पडणे कठीण होणार आहे. परिणामी खरीप हंगामावर परिणाम पडण्याची शक्यता आहे. सध्या शेतकरी मशागतीच्या कामात गुंतले आहेत. काहींची रबी हंगामातील पीक काढणी सुरु आहे. तर काहींची पीक काढणी आटोपली आहे. शेती पेरणीसाठी सज्ज करण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरु झाली आहे. साधारणत: मे महिन्याच्या शेवटी शेतकरी खते आणि बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रांवर गर्दी करतात. यासाठी आणखी दीड महिना वेळ आहे.परंतु येत्या दीड महिन्यात महाराष्ट्र कोरोनामुक्त होईल का, या प्रश्नाचे उत्तर अद्यापतरी कुणीही देत नाही. हंगाम जवळ आल्याने शेतकºयांची लगबग वाढली आहे. मे महिन्यात जर कोरोना आटोक्यात आला नाही, तर शेती व्यवसायाची मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. २० मे नंतर शेतकरी बियाणे, खते खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यावेळी जर कोरोना आटोक्यात आला नाही तर सोशल डिस्टंन्सिगची मोठी समस्या उद्भवणार आहे.दुसरीकडे कृषी विक्रेतेही चिंतेत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांकडून मागणी होणाºया वेगवेगळ्या दर्जाचे, कंपनीचे बियाणे व खते कृषी विक्रेते उपलब्ध करुन देतात. मात्र लॉकडाऊन असाच कायम राहीला आणि वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन आणखी तीव्र करण्यात आला. तर कंपन्यांकडून खते व बियाणांचा पुरवठा होईल का, अशी भीती कृषी विक्रेत्यांनासध्या सतावत आहे.संकटांची मालिका सुरूचचालू वर्ष शेतकºयांसाठी वाईट ठरत आहे. एप्रिल महिना सुरु झाला तरी अवकाळी पाऊस थांबलेला नाही. मागील हंगामात दिवाळीनंतरही अवकाळी पाऊस सुरुच होता. त्यामुळे सोयाबिन पिकाचे नुकसान झाले. कापूस, भाजीपाला पिकालाही मोठा फटका बसला. या संकटातून शेतकरी सावरत असतानाच, कोरोनाचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटाचे लवकर सुटका मिळावी अशी प्रार्थना सध्याशेतकरी करीत आहेत.कापूस विक्रीसाठी शेतकरी चिंतेतकोरोना विषाणूचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता, देशपातळीवर १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यामुळे सीसीआयची कापूस खरेदी गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. खासगी जिनिंगही बंद असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या घरात शेतमाल आहे. तो विकल्याशिवाय हाती पैसे येणार नसल्याने शेतकऱ्यांपुढे खरीप हंगामासाठी लागणारे खते-बियाणे खरेदींची अडचण वाढली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसagricultureशेती