शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बीपीएलधारक शेतकऱ्यांसाठी कृषी योजना

By admin | Updated: October 27, 2014 22:33 IST

दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील व उपायोजना क्षेत्राबाहेरील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना

शासन योजना : लाभ घेण्याचे कृषी विभागाचे आवाहनचंद्रपूर : दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य वाढविण्यासाठी आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील व उपायोजना क्षेत्राबाहेरील दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांसाठी आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत १३ शेती विषयक योजनांचा समावेश करण्यात आला आहे. योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.२०१४-१५ या वर्षात दारिद्र्य रेषेखालील आदिवासी शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या १३ शेतीविषयक योजनांमध्ये नवीन विहीर बांधकाम, जमिन सुधारणा, निविष्ठा पुरवठा, पिक संरक्षण अवजारे व शेती सुधारीत अवजारे, बैलगाडी, बैलजोडी, इनवेल बोअरवेल, जुनी विहीर दुरुस्ती, पाईप लाईन, पंपसेट, शेततळे, परसबाग, ठिबक तथा तुषार सिंचन अशा योजनांचा समावेश आहे.कृषी विषयक योजनांच्या लाभासाठी अनुदान निश्चित करण्यात आले आहे. जमीन सुधारणा (एक हेक्टर मर्यादा) योजनेअंतर्गत मृद संधारण निकषानुसार ४० हजाराचे अनुदान देण्यात येईल. प्रात्यक्षिक निविष्ठा वाटप (मर्यादा एक हेक्टर) पाच हजाराचे अनुदान, पीक संरक्षण व शेती सुधारीत अवजारांसाठी १० हजार, बैलजोडीसाठी ३० हजार, बैलगाडीसाठी १५ हजाराचे शासकीय अनुदान देण्यात येणार आहे. जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी ३० हजारापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. इनवेल बोरिंगसाठी २० हजार, पंपसंचासाठी २० हजार पाईप लाईनसाठी (३० मीटरच्या निकषानुसार) २० हजारापर्यंत अनुदान, नवीन विहीर बांधकामासाठी ७० ते १ लाखापर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. शेततळे खोदकामासाठी ३५ हजार, परसबाग कार्यक्रमांतर्गत २०० रुपये प्रती लाभार्थी तर तुषार सिंचन व ठिंबक सिंचन योजनेसाठी प्रती हेक्टर २५ हजाराचे अनुदान देण्यात येणार आहे.योजनांच्या लाभार्थ्यांची निवड पंचायत समिती स्तरावर करायची असून पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी तयार केलेल्या यादीमधून लाभार्थ्यांची निवड करतांना जिल्हास्तरावर समिती नेमण्यात आली असून लाभार्थी निवडीचे अधिकार सदर समितीला राहतील.जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे समितीचे अध्यक्ष असतील, ततर जि.प.चे कृषी विकास अधिकारी हे सचिव राहतील. समितीमध्ये सदस्य म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे जिल्हास्तरीय अधिकारी, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. आदिवासी शेतकरी पंचायत समितीच्या कृषी विभागाशीी संपर्क साधून योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)