शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या विरोधात झाडावर चढून आंदोलन

By admin | Updated: April 24, 2015 00:53 IST

वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदन देवूनही वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेजिंग योजना बंद करण्यात आली नाही.

वरोरा : वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदन देवूनही वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेजिंग योजना बंद करण्यात आली नाही. त्यामुळे थ्री फेजचा पुरवठा होत नसल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सिंगल फेजिंग योजना बंद करावी या मागणीसाठी गुरूवारी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर नंदोरी व परिसरातील गावातील नागरिकांनी मोर्चा काढला. नागरिकांनी कार्यालय परिसरातील झाडावर चढुन तब्बल तीन तास अनोखे आंदोलन केले. अखेरीस अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.सिंगल फेजींग योजना बंद करून थ्री फेज योजना सुरू करावी, याबाबत वारंवार निवेदन देऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरूवारी अचानक भाजपचे भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे यांच्या नेतृत्त्वात पुरूष व महिलांनी घागरी घेवून वरोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. अचानक मोर्चेकरी आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच वीज वितरण कंपनीच्या आवारत असलेल्या झाडावर नरेंद्र जीवतोडे हे सोबत रॉकेलची बॉटल घेऊन चढले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत झाडावरुन उतरणार नाही, असा पवित्रा नरेंद्र जीवतोडे यांनी घेतल्याने काही काळ प्रशसनासमोर पेच निर्माण झाला होता.प्रारंभी उपकार्यकारी अभियंता रमेश नागदेवते, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपा तालुका संघटक ओमप्रकाश मांडवकर, जि.प. सदस्य अर्चना जीवतोडे, पचायत समिती सदस्य वर्षा नन्नावरे, रमेश तिखट, सुधाकर जीवतोडे आदी सोबत चर्चा केली. परंतु लेखी आश्वसनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली. वीज वितरण कंपनी वरोराचे प्रभारी कार्यकारी अभियंता काका रामटेके घटनास्थळी दाखल होवून आंदोलकांशी चर्चा केली. वरोरा व भद्रावती तालुक्यातील गावामधील सिंगल फेजिंग योजना येत्या आठ दिवसांत बंद करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ तसेच नंदोरी गावातील विद्युत समस्या येत्या आठ दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)