शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘त्या’ कुत्र्याचे शवविच्छेदन

By admin | Updated: April 18, 2015 01:14 IST

चंद्रपूर शहरात शुक्रवारी शहर पोलिसांना एका महिला साहित्यिकेच्या कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले.

चंद्रपूर: चंद्रपूर शहरात शुक्रवारी शहर पोलिसांना एका महिला साहित्यिकेच्या कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले. सदर कुत्र्याचा गुरुवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हात वर केले. मात्र प्रकरण जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या दालनात पोहचल्यानंतर शहर पोलिसांना त्या मृत कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले. स्थानिक कारागृह परिसरात निर्मला चांदेकर ऊर्फ नीर शबनम (७०) या वयोवृद्ध महिला वास्तव्याला आहेत. चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात त्या प्राचार्यपदीही कार्यरत होत्या. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहीली असून त्यांना महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त आहे. सेवानिवृत्तीनंतर त्या स्थानिक कारागृह मार्गावर स्वत:च्या जुन्या घरात एकट्या वास्तव्याला आहेत. त्यामुळे त्यांनी घरात अनेक कुत्रे पाळले आहेत. काही लोक त्यांची जागा हडपण्यासाठी त्यांच्या कुत्र्यांना ठार मारत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी पोलीस ठाण्यात ्रतक्रारीही नोंदविल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांपैकी एक कुत्रा अचानक मरण पावला. यासंदर्भात त्यांनी शहर पोलिसांसोबत संपर्क साधून कुत्र्याचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. मात्र ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांनी यासाठी नकार दिला. मात्र निर्मला चांदेकर यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजीव जैन यांच्याकडे तक्रार केली. जैन यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश सिरस्कर यांना दिल्यानंतर स्थानिक पशु चिकीत्सालयात मृत कुत्र्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)