महागाव येथे व्यसनमुक्ती रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:00 AM2019-09-17T06:00:00+5:302019-09-17T06:00:21+5:30

शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रवीण डांगे होते.

Addiction-free Rally at Mahagaon | महागाव येथे व्यसनमुक्ती रॅली

महागाव येथे व्यसनमुक्ती रॅली

Next
ठळक मुद्देगाव संघटनेचा पुढाकार : गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व सत्संग कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव (बुज) : शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटना महागावच्या वतीने दारू, व्यसनमुक्ती मार्गदर्शन, सत्संग आणि महागाव (बुज.) तसेच महागाव (खुर्द) या दोन गावांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीचे अभियंता किशोर वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रवीण डांगे होते. प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी मनोहर रामटेके, व्यसनमुक्ती संघटना गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष भाऊराव ठाकरे, अनिल डोंगरे, बालाजी बोरकुटे, दिगंबर वासेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्वप्रथम गावातून व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये व्यसनमुक्ती संघटनेचे सदस्य सहभागी झाले होते. रॅलीनंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्संगाचाही कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना उद्घाटक किशोर वाळके म्हणाले, दारूच्या व्यसनापासून दूूर राहिल्यास समाजात मानसन्मान मिळतो. घरी सुखसमृद्धी लाभण्यास मदत होते. वर्तमानकाळात जगत असताना आपल्यावर काय संकटे येतात, याचा विचार केला पाहिजे, असे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालन वनपाल गजानन रामटेके यांनी केले. यशस्वीतेसाठी गावातील तरूण वर्ग व महिला बचतगटाच्या सदस्यांनी सहकार्य केले.
महागाव (बुज.) येथे व्यसनमुक्ती समितीच्या वतीने दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमामुळे गावातील नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याची प्रेरणा मिळते. या कार्यक्रमात अनेक लोक हिरहिरीने सहभाग नोंदवितात. त्यामुळे महागाव (बुज.) चा उपक्रम इतर गावांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे.

Web Title: Addiction-free Rally at Mahagaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.