शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
3
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
6
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
9
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
10
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
11
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
12
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
13
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
14
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
15
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
16
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
17
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
18
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
19
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
20
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध व अपंगांना बनविले आरोपी

By admin | Updated: December 10, 2014 22:54 IST

शहरातील विंजासन परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या मालकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन वयोवृद्ध व अपंगाना आरोपी बनविले. त्यांना बेदम मारहाणही केली.

भद्रावती : शहरातील विंजासन परिसरामध्ये असलेल्या तलावाच्या मालकीवरुन दोन गटात झालेल्या मारहाण प्रकरणात पोलिसांनी चक्क दोन वयोवृद्ध व अपंगाना आरोपी बनविले. त्यांना बेदम मारहाणही केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
६ डिसेंबरला विंजासन येथील ५२ एकर तलावाच्या मालकीवरुन दोन गटात जबरदस्त हाणामारी झाली. यात एका महिलेसह दहा जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत आतापर्यंत ३४ जणांना ताब्यात घेतले. यापैकी महिला व वृद्ध आरोपींना न्यायालयाने जामीन दिला तर १३ आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलिसांनी अटक सत्र राबविताना बळाचा वापर करुन अनेकांना जखमी केले. ८ डिसेंबरच्या पहाटे ७५ वर्षीय तानबा कृष्णा मांढरे व ६५ वर्षीय वृद्ध व अपंग महिला मंदा वाघू मांढरे यांना पोलिसांनी घरातून ओढून काठीने बेदम मारहाण करुन रक्तबंबाळ केले. यावेळी पोलिसांनी अश्लिल शिव्यांचा वापर केला. जखमी झालेले ४० ते ६० वर्षाच्या दरम्यानचे आहेत. त्यांना ७५ वर्षाचा वृद्ध आणि ६५ वर्षाची अपंग व वृद्ध महिला खरच मारहाण करुन जखमी करु शकते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सदर दोन्ही वृद्धांनी ही आपबीती लोकमतजवळ सांगितली. हे दोन्ही वृद्ध पोलिसांच्या मारहाणीमुळे जखमी होते. तसेच अंगावरील कपडे रक्तांनी माखले होते. यातील एकाला काठीचा आधार घेतल्याशिवाय चालता येत नाही. पोलिसांनी अशा वृद्धांना मारहाणीतील आरोपी बनवून स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचा प्रकार केला असून याबाबत रोष व्यक्त केला जात आहे. विंजासन या भागातील नागरिक पोलिसांच्या या दडपशाहीमुळे घरदार सोडून बाहेर गेले आहेत. (शहर प्रतिनिधी)