शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आंतर मशागतीच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST

आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात शेतशिवार फुलले : दमदार पावसामुळे खरीप पिकांना जीवदान

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : यावर्षी खरीप हंगामात मृग नक्षत्रापाठोपाठ आद्रानेही वेळेवर हजेरी लावली. त्यामुळे पीक लागवडीसह बहुतांश पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. सद्या पिकातील आंतर मशागतींना वेग आला असून शेतकऱ्यांसह मजुरांच्या लगबगीने शेतशिवार फुलले आहेत.आद्रा नक्षत्राचा दमदार पाऊस बरसला आहे. त्यामुळे छोटे-मोठे नाले वाहते झाले आहेत. खरीपाच्या पिकांसाठी यंदा अनुकूल हवामान व पावसाचीही साथ मिळाल्याने कपाशी, सोयाबीन, तूर आदी पिकांना पोषक वातावरण मिळत आहे. त्यामुळे शेत शिवारात शेतकरी आंतर मशागतीच्या कामात व्यक्त आहे. विशेष म्हणजे, धान उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, भद्रावती, राजुरा, कोरपना तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांनी आता डवरनी, निंदनाना सुरुवात केली आहे. तर धान उत्पादक असलेल्या सावली, ब्रह्मपुरी, मूल, सिंदेवाही या तालुक्यातील शेतकºयांनी रोवणीसाठी पऱ्हे टाकणे सुरु केले आहे. काहीजण बैलजोडीच्या साहाय्याने पारंपरिक अवजारांसोबतच तर काही ट्रॅक्टरद्वारे मशीगतीची कामे करीत आहे. शाळांना सुटी असल्यामुळे विद्यार्थीही आई-वडीलांना शेतातील मशागतीच्या कामाला हातभार लावत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील काही भागात सोयाबीन, उगवले नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.मजुरी वाढल्याने शेतकरी त्रस्तलॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक आडचणीत असतानाच मजुरीत सातत्याने वाढ होत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भार सहन करावा लागत आहे. शेतीची अंतर्गत मशागतीची कामे सुरू आहेत. मात्र यासाठी शेतकºयांना प्रत्येक मजुराला जास्तीची मजुरी द्यावी लागत आहे. यामुळे शेती करणे परवडत नसल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. शेतीमालाला हमी भाव नसल्याने शेती आर्थिक नुकसान होत आहे. मात्र हाताला काम नसल्यामुळे कसेतरी पोेट भरायचे म्हणून शेती करायची, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.

टॅग्स :agricultureशेती