शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्सद्वारे पुण्याहून चंद्रपुरात आलेले सुमारे ३०० जण थर्मल स्क्रिनिंगविना घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:53 IST

रविवारी जनता कर्फ्यू असताना खासगी ट्रॅव्हल्सने सुमारे ३०० जण पुण्यासह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात परतले. या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे होते.

ठळक मुद्देशहराचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली फाट्यावर थर्मलस्क्रिनिंग होणार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूमुळे स्वजिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानक किंवा बसस्थानकावर थर्मल स्क्रिनिंग करुन घरी पाठविण्यात येत आहे. मात्र रविवारी जनता कर्फ्यू असताना खासगी ट्रॅव्हल्सने सुमारे ३०० जण पुण्यासह अन्य ठिकाणाहून जिल्ह्यात परतले. खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांनी या प्रवाशांचे थर्मल स्क्रिनिंग करण्यासाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधणे गरजेचे होते. मात्र त्यांना बसथांब्यावर उतरवून घरी जावू दिले. यामध्ये कोणी कोरोना बधित असल्यास धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब लक्षात येताच सोमवारपासून चंद्रपूरचे प्रवेशद्वार असलेल्या पडोली फाट्यावर उपप्रादशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या पुढाकारात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.मागील काही दिवसांपासून शहरात येणाºया प्रवाशांची थर्मल स्क्रिनिग करण्यात येत आहे. शनिवारी तबब्ल १०८५ नागरिक रेल्वे गाडीने पुण्यातून चंद्रपूर व बल्लारपूर रेल्वे स्थानकावर पोहचले होते. या प्रत्येकांची नोंद घेण्यात आली. तसेच त्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांच्या हातावर शिक्के मारले गेले. रविवारी सकाळापसून पुण्याहून ८ ते १० खाजगी ट्रॅव्हल्समधून किमान ३०० विद्यार्थी-प्रवासी शहरात दाखल झाले. त्यांची थर्मल स्क्रिनिंग तर झालीच नाही. शिवाय त्यांच्या हातावर शिक्केही मारण्यात आले नाही.खासगी वाहनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. सोमवारपासून खासगी वाहनाने शहरात येणाऱ्या प्रवाशांची शहर दाखल होण्यापूर्वीच येत असलेल्या पडोली फाट्यावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे.- निवृत्ती राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस