९३ कोरोनामुक्त तर ३५ नव्या बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:44 IST2020-12-15T04:44:01+5:302020-12-15T04:44:01+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी ९३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३५ कोरोनाबाधित रुग्णांची ...

93 corona-free and 35 new victims added | ९३ कोरोनामुक्त तर ३५ नव्या बाधितांची भर

९३ कोरोनामुक्त तर ३५ नव्या बाधितांची भर

चंद्रपूर : जिल्ह्यात सोमवारी ९३ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ३५ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार ३५५ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार २७६ झाली आहे. सध्या ७४२ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ६० हजार ५५७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३७ हजार २०९ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

सोमवारी मृत झालेल्यांमध्ये बेहरमबाबा नगर, घुघ्घुस येथील ५७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३७ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३१०, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

सोमवारी बाधित आलेल्या ३५ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २२, चंद्रपूर तालुक्यातील पाच, भद्रावती तीन, राजुरा एक, तसेच इतर ठिकाणच्या चार रुग्णांचा समावेश आहे.

Web Title: 93 corona-free and 35 new victims added