शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोनाचे अ‍ॅक्टीव्ह रुग्ण ८४१

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनावर मात करणाºया नागरिकांच्या संख्येने २० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तसेच अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतदेखील झपाटयाने ...

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनावर मात करणाºया नागरिकांच्या संख्येने २० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तसेच अ‍ॅक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतदेखील झपाटयाने घट होत असून महिन्याभरापूर्वी २५०० वर असलेली अ‍ॅक्टीव्ह रुग्णांची संख्या आता ८४१ वर आल्याने नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

शनिवारी २४८ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ८६ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २१ हजार २६६ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २० हजार ९१ झाली आहे. सध्या ८४१ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख ५९ हजार ७८४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख ३६ हजार ३९८ नमुने निगेटीव्ह आले आहेत.

शनिवारी बाधित झालेल्या ८६ रुग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील २७, चंद्रपूर तालुक्यातील नऊ, बल्लारपूर तीन, भद्रावती सहा, ब्रम्हपुरी सात, नागभीड पाच, सिंदेवाही दोन, मूल पाच, सावली एक, राजुरा सात, चिमूर तीन, वरोरा सहा, कोरपना तीन तसेच इतर ठिकाणच्या दोन रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

दोघांचा मृत्यू

शनिवारी जिल्ह्यात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. यात नगिनाबाग, चंद्रपूर येथील ८३ वर्षीय पुरूष व गडचिरोली जिल्ह्यातील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३३४ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३०७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १६, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.