शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवे नुकसान भरपाईसाठी ६८ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 06:00 IST

पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली.

ठळक मुद्देपीक पंचनामे पूर्ण : जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे अहवाल सादर

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्यात आले. सर्व १५ तालुक्यातील पीक नुकसानाच्या पंचनामा अहवाल विभागीय आयुक्तांकडे सादर झाला. त्यानुसार ९७ हजार ८६२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी विभागीय आयुक्तांच्या वतीने जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे ६८ कोटींची मागणी केली आहे.पावसाळा संपल्यानंतर महिनाभराच्या कालावधीत सतत बरसलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात कापणीला आलेल्या व कापणी झालेल्या सोयाबीन, कापूस, भात व अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी सोयाबीन सडले असून कपाशीला कोंब फूटले. वेचणीला आलेला कापूस भिजल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील खरीप पिके वाया गेली. हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने पळविल्याने शेतकरी संकटात सापडला. पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने जिल्हा प्रशासनामार्फत ३० आॅक्टोबरपासून तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या संयुक्त पथकांद्वावारे जिल्ह्यातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले. पंचनाम्याचे काम पूर्ण झाले असून, जिल्ह्यातील १५ तालुक्यातील अंतिम अहवाल तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील ९७ हजार ८२६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. पीक नुकसानाचा अहवाल ११ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात आला.सहा तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यात ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले बाधित क्षेत्र ९७ हजार ८६२ हेक्टर एवढे आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान वरोरा, चिमूर, कोरपना, राजुरा, चंद्रपूर व सावली तालुक्यात झाल्याचे अंतिम अहवालात नमुद करण्यात आले. कापूस, सोयाबीन व भात उत्पादक शेतकऱ्यांनाच मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शासनाकडून मदत कधी मिळणार, असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत.पीक विम्यासाठी ११ हजार शेतकऱ्यांचे अर्जखरीप हंगामातील पिकांचा विमा काढणाºया लाखो शेतकऱ्यांपैकी मंगळवारपर्यंत केवळ ११ हजार शेतकºयांनी विमा क्लेमसाठी विमा कंपनी व जिल्हा प्रशासनाकडे अर्ज सादर केले. नुकसानीचा पंचनामा करताना विमा कपंनीचे प्रतिनिधी उपस्थित राहिले नाही तर कृषी विभागाकडून केलेला पंचनामा विमा कंपनीला मान्य करावा लागेल, असा आदेश राज्याचे कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी दिला.

टॅग्स :agricultureशेती