शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नवे ६ कोरोना रूग्ण आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा सोमवारी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील १२९ बाधित अधिक ४ बाहेरील बाधित अशी एकून कोरोना रूग्णांची संख्या १३४ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात बुधवारी आणखी ५ कोरोना बाधित आढळले. पुणे येथील राज्य राखीव पोलीस दलाच्या तीन जवानांसह १२८ झालेली सोमवारी रात्रीची संख्या बुधवारी १३३ वर पोहोचली आहे. मंगळवारी जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह आढळला नव्हता.जिल्हा आरोग्य यंत्रणेनेने दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पुढे आलेल्या बाधितांच्या संख्येमध्ये राज्य राखीव पोलिस दलाच्या आणखी एका जवानाचा समावेश आहे. कोल्हापूर पोलीस कंपनीच्या या ३२ वर्षीय जवानाचा सोमवारी स्वॅब घेण्यात आला होता. बुधवारी या जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील १२९ बाधित अधिक ४ बाहेरील बाधित अशी एकून कोरोना रूग्णांची संख्या १३४ झाली आहे. ऊर्जानगर येथे आढळलेल्या एका बाधिताच्या संपर्कातील तीन जण पॉझिटिव्ह ठरले आहे. यामध्ये बाधितांची ६० वर्षीय आई व सात वर्षीय नातवासोबतच घरामध्ये मदतनीस म्हणून काम करणाऱ्या ३१ वर्षीय व्यक्तिचा समावेश आहे. बुधवारी पॉझिटिव्ह अहवालामध्ये वरोरा तालुक्यातील मोहबाळा येथील ३८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. नागपूर येथून आल्यानंतर हा व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात न राहता एक दिवसासाठी घरी गेला होता. नंतर संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले. त्यांचा स्वॅब घेतला असता ते पॉझिटिव्ह म्हणून पुढे आले आहे. आतापर्यंत ७९ बाधित कोरोना आजारातून बरे झाले. ५४ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहे.हॉटेल, लॉज, खासगी विश्रामगृह सुरू होणारचंद्र्रपूर : जिल्ह्यात निवासाची सुविधा असलेले सर्व हॉटेल, लॉज, खासगी विश्राम गृह (प्रतिबंधीत क्षेत्रातील आस्थापना वगळता) ३३ टक्के या मर्यादित क्षमतेने नियम व अटींच्या आधीन राहून सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर कोविड १९ प्रतिबंधात्मक उपायाबाबत मार्गदर्शक तत्त्वे पोस्टर्स, स्टॅण्डिज, दृकश्राव्य इत्यादी साधनांद्वारे स्पष्टपणे दर्शविणे बंधनकारक आहे. हॉटेल व पार्किंगमध्ये वाहनतळांचे योग्य व्यवस्थापन करावे.रांगेसाठी विशिष्ट खुणा कराव्यात, सामाजिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी बसण्याची व्यवस्था करावी, बाहेरील व्यक्तीकडून प्रवेश करण्यापूर्वी थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक आहे. रिसेप्शन टेबल, त्याजवळील जागेत संरक्षक काच लावावा. वातानुकूलीत उपकरणांचे तापमान सेटिंग २४-३० डिग्री सेल्सिअस श्रेणीत ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या