२४ तासात ५७ कोरोनामुक्त , तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:24 IST2021-01-04T04:24:20+5:302021-01-04T04:24:20+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४०२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ...

57 killed in 24 hours, three killed | २४ तासात ५७ कोरोनामुक्त , तिघांचा मृत्यू

२४ तासात ५७ कोरोनामुक्त , तिघांचा मृत्यू

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २२ हजार ४०२ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २१ हजार ६४२ झाली आहे. सध्या ३८९ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ७८ हजार ३९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ५२ हजार ६१८ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहराच्या चोर खिडकी, जटपुरा गेट येथील ८० वर्षीय महिला, रामनगर येथील ८२ वर्षीय पुरुष व सिंदेवाही येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३७१ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३३८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ ११, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

रविवारी बाधित आलेल्या ४६ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २३, चंद्रपूर तालुका चार, बल्लारपूर तीन, भद्रावती दोन, ब्रह्मपुरी दोन, सिंदेवाही एक, मूल दोन, सावली एक, गोंडपिपरी एक, राजुरा दोन, चिमुर दोन व वरोरा एक, कोरपना एक व इतर ठिकाणच्या एका रुग्णाचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघताना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: 57 killed in 24 hours, three killed