शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
2
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
3
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
4
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
5
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
6
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
7
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
8
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
9
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
10
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
11
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
12
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
13
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
14
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
15
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
16
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
17
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
18
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
19
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
20
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुक निरीक्षकाकडून ४० हजारांची खंडणी, अशोक मत्तेला अटक व सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:38 IST

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहन निरीक्षकांकडून ४० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी येथील अशोक मत्तेला रामनगर पोलिसांनी अटक ...

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील वाहन निरीक्षकांकडून ४० हजार रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी येथील अशोक मत्तेला रामनगर पोलिसांनी अटक केली. ही कारवाई २५ जानेवारीला ५ वाजता करण्यात आली. बुधवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केला असता जामिनावर सुटका करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून लाच घेताना अडकवतो, असे म्हणून दरमहा खंडणीची मागणी केल्याची तक्रार श्रीनिवास जल्लावार यांनी रामनगर पोलीस ठाण्यात केली. याआधारे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलिसांनी सापळा रचून येथील जिल्हा स्टेडियम परिसरात वाहन निरीक्षक जल्लावार यांच्याकडून ४० हजार रुपये घेतल्यानंतर पकडले. याप्रकरणी पोलिसांनी कलम ३८४ अन्वये गुन्हा दाखल करून अशोक मत्तेला अटक केली. अधिक तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली. अधिक तपास रामनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एच. व्ही. एकरे करीत आहे. या प्रकरणात अशोक मत्तेवरील कारवाई टाळण्यासाठी चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार हे रात्रीत पोलीस ठाण्यात गेले होते, अशी चर्चा शहरात सुरू होती. यामुळे या प्रकरणाला नवे वळण आले.

दारू तस्करांकडून बदनामीचा प्रयत्न : किशोर जोरगेवार

अशोक मत्तेवरील कारवाई टाळण्यासाठी मी रात्री पोलीस ठाण्यात गेल्याचे माझ्याही कानावर आले. वास्तविक, मत्ते हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहे. त्यांना सायंकाळी ५ वाजता अटक झाली. कारवाई झाल्यानंतर पाेलीस ठाण्यात जाण्याचा प्रश्नच येत नाही. काही दारू तस्करी करणारी मंडळी ही खोटी माहिती जनतेत पसरवून बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

बाॅक्स

तक्रारीचा आरटीओशी काहीही संबंध नाही

ही तक्रार वाहन निरीक्षक श्रीनिवास जल्लावार यांची खासगी आहे. या कारवाईशी चंद्रपूर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाशी काहीही संबंध नाही, अशी प्रतिक्रिया नव्यानेच रूजू झालेले चंद्रपूरचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिली.